राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी ! महागाई भत्ता 4 टक्के वाढीस अखेर वित्त विभागाची मंजुरी !

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय / जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 4 टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करणेबाबत राज्याच्या वित्त विभागाकडुन प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून , वित्त विभागाकडुन या प्रस्तावास मंजुरी देखिल मिळालेली आहे .या डी.ए वाढीसंदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .

माहे डिसेंबर 2022 च्या वेतन / पेन्शन देयकासोबर वाढीव डी.ए रोखीने –

राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ताचा लाभ हा माहे डिसेंबर 2022 च्या वेतन / पेन्शन देयकासोबर प्रत्यक्ष्‍ा रोखिने अदा करण्यात येणार आहे .वाढीव 4 टक्के महागाई भत्ता हा माहे जुलै 2022 पासुन प्रत्यक्ष रोखिने अदा करणे संदर्भात राज्य शासनाकडुन हिरवा कंदील मिळाल्याने , आता राज्य कर्मचाऱ्यांना देखिल केंद्र सरकारच्या धर्तीवर 38 टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागु होणार आहे . राज्य शासनाचे दि.19 डिसेंबर 2022 पासुन हिवाळी अधिवेशन सुरु होणार असून या अधिवेशनांध्ये डी.ए वाढीसह कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले जाणार आहेत .

4 टक्के वाढीव डी.ए बाबतचा सविस्तर शासन निर्णय अधिवेशानंतर निर्गमित करण्यात येईल . राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासुन थकबाकीसह 4 टक्के डी.ए वाढ माहे डिसेंबर महिन्याच्या वेतनात रोखीने अदा करण्यात येईल .यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ अनुज्ञेय होणार आहे .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट साठी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामिल व्हा


Leave a Comment