विधानमंडळ हिवाळी अधिवेशन कामकाज संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित .

Spread the love

विधानमंडळाचे दि.19 डिसेंबर 2022 पासुन हिवाळी अधिवेशनास सुरुवात होत आहे .विधामंडळाच्या अधिवेशनाशी संबंधित कामकाज प्राथम्यक्रमाने हाताळण्याबाबत , संसदीय कार्य विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.02.12.2022 रोजी निर्गमित झालेले आहेत . या संदर्भातील संसदीय कार्य विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे आगामी अधिवेशन, विधानभवन नागपुर येथे सोमवार दिनांक 19.12.2022 पासुन होत आहे .अधिवेशना संदर्भातील कामकाज प्राथम्य क्रमाने देण्यात आलेल्या आहेत .यामध्ये प्रथम तारांकित प्रश्नांच्या उत्तरांच्या प्रती पाठविण्याबाबतच्या तसेच सदर प्रश्न त्याच प्रणाली द्वारे ऑनलाईन पद्धतीने इतर विभागांकडे हस्तातरित करण्या संदर्भातील सुचना देण्यात आल्या आहेत . तसेच विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये शासकीय विधेकांवर चर्चा होऊन ती संमत होणे ही बाबत अत्यंत महत्वाची आहे याकरीता शासकीय विधेयके यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे .

त्याचबरोबर औचित्याचे मुद्दे विशेष उल्लेख कपात सूचना आतारांकित प्रश्न देखिल सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवणेबाबत सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत .त्याचबरोबर अशासकीय कामकाज , वार्षिक अहवाल , सभागृहातील मुद्दे / आश्वासने / निर्देश यांची नोंद घेणे बाबत सुचना निर्गमित करण्यात आलेले आहेत . या संदर्भातील नियोजन विभागाचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Comment