Breaking News : केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा सुरु करणार जुनी पेन्शन योजना ?

Spread the love

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा जुनी पेन्शन योजना लागु करणे संदर्भातील मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे .2004 नंतर नोकरीस लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करुन राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे . या योजनेस केंद्र सरकारी त्याचबरोबर राज्य कर्मचाऱ्यांकडुन मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे .

जुनी पेन्शन योजना लागु करण्याचा RSS चा सल्ला –

केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे , भारतीय जनता पार्टीची जनतेमध्ये काम करणारी संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होय . राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारला जुनी पेन्शन योजना परत लागु करण्याचा सल्ला दिला आहे . कारण देशातील कर्मचारी केवळ जुनी पेन्शन या मुद्द्यावर मत देण्याची शक्यता आहे . कर्मचाऱ्यांकडुन वोट फॉर ओल्ड पेन्शन असा कॅम्पेन सुरु केल्याने , देशातील कर्मचारी जुनी पेन्शनवर सकारात्मक असणाऱ्याच पक्षांना मतदान करतील . यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याचा मोठा सल्ला दिलेला आहे .

भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी भुमिका असल्याने , केंद्राकडुन या सल्याचा केंद्र स्तरावर मोठा विचार केला जात आहे .यासाठी केंद्र सरकारकडुन पुढील आर्थिक वर्षामधील बजेट मध्ये जुनी पेन्शन योजनासाठीची प्रोव्हीजन करण्याची मोठी शक्यता वर्तविली जात आहे .जुनी पेन्शन योजना लागु केल्यास बजेटमध्ये मोठी तफावत येण्याची चिंता नुकतेच निती आयोगाकडुन व्यक्त करण्यात आली होती .परंतु कर्मचाऱ्यांचे हित हे केवळ जुनी पेन्शन योजनेमध्ये असल्याने , यावर सकारात्मक निर्णय केंद्राकडुन घेण्यात येईल .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा


Leave a Comment