राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच एक मोठी खुशखबर मिळणार आहे . ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्र सरकारप्रमाणे 60 वर्षे होणार आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सेवेचा मोठा लाभ मिळणार आहे .या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात …
सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे –
राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावी अशी कर्मचाऱ्यांची मोठी मागणी होत आहे . विविध कर्मचारी संघटनांकडुन याबाबत राज्य सरकारला वेळोवेळी निवेदनही दिले आहेत . केंद्र व इतर 25 राज्यांनी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आली आहे .देशातील बहुतांश राज्यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढविले आहेत , तरी महाराष्ट्र राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वयामध्ये वाढ न केल्याने राज्य कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी आहे .
सेवानिवृत्तीचे वय वाढविणे आवश्यक –
आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये सरकारी नोकरींच्या स्पर्धेमध्ये अनेक जन नशिब आजमवत असतात . काहींना कमी वयामध्ये यश मिळते , तर अनेकांना सरकारी नोकरीसाठी अनेक वर्षे कष्ट करावे लागते यामुळे नोकरीमध्ये दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सरासरी वय हे 28 वर्षे ते 35 वर्षे या दरम्यान आहे . यामुळे अशा कर्मचाऱ्यांना कमी सेवा मिळते .
2 वर्षे अतिरिक्त सेवेचा लाभ मिळेल –
कर्मचाऱ्यांच्या मागणींचा विचार करुन राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरुन 60 वर्षे केल्यास , राज्यातील कर्मचाऱ्यांना 2 वर्षे अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार आहे .राज्य शासनाच्या हिवाळी अधिवेशनांमध्ये सदरचा विषय चर्चेला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे .
कर्मचारी विषयक ,भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !