राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर : माहे डिसेंबर महिन्यांच्या वेतनासोबत मिळणार वाढीव डी.ए सह इतर मोठे लाभ !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , जिल्हा परिषद , व इतर पात्र कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्‍य कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबरच्या पगार / निवृत्तीवेतनासोबत वाढीव डी.ए सह इतर मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत .याबाबतची सविस्तर लेटेस्ट अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

महागाई भत्ता 4 टक्के वाढ –

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के डी.ए वाढ माहे जुलै 2022 पासुन लागु करण्यात येणार आहे .या संदर्भातील अधिकृत्त निर्णय हिवाळी अधिवेशानामध्ये घेण्यात येणार असल्याची माहीती समोर येत आहे . सदरचा वाढीव महागाई भत्ता माहे डिसेंबर महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकांसोबत प्रत्यक्ष रोखीने अदा करण्यात येणार आहे .शिवाय जुलै 2022 पासुनचा वाढीव 4 टक्के डी.ए फरक देखिल अदा करण्यात येईल .

7 वा वेतन आयोगाचा पहिला / दुसरा हप्ता  तसेच उर्वरित हप्ते –

सातवा वेतन आयोगाचा पहीला / दुसरा अदा करणे बाकी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पहिला व दुसरा हप्ता अदा करणेसाठी राज्य शासनाकडे निधींची मागणी करण्यात आलेली आहे .अधिवेशांमध्ये सदर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा पहिला / दुसरा व उर्वरित हप्ते अदा करण्यासाठी निधींची उपलब्धता करुन देण्यात येणार आहे .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉईन करा .


Leave a Comment