Breaking News : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याचा ठराव एकमताने मंजुर !

Spread the love

राज्य शासन सेवेत सन 2005 नंतर शासकीय सेवेत रुजु झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबतचा ठराव एकमताने मंजुर झाल्याने , राज्यातील कर्मचाऱ्यांना एक मोठा आधार मिळालेला आहे . गामपंचायत मोझर या ग्रामसभेला सन 2005 नंतर लागलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबतचा ठराव मांडण्यात आलेला होता .

या ठरावाचे सूचक श्री.अतुल भेंडे हे होते .वरील ठरांवावर ग्रामसभेमध्ये सविस्तर चर्चा झाली करण्यात आली .सन 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु नाही त्यांना शासनाची NPS / DCPS योजना लागु असून त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास  किंवा सेवा समाप्ती नंतर निश्चित पेन्शनची साश्वती नाही . त्यामुळे शासनाने सरसकट कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी . जेणेकरुन उमेदीच्या काळात त्यंनी दिलेल्या सेवेचा आधार त्यांना पेन्शन स्वरुपात त्यांच्या म्हातारपणात होईल .

याप्रमाणे सन 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी असा ठराव सर्वांनुमते मुजुर करण्यात आला .ग्रामसभेकडुन हा ठराव एकमताने स्विकृत करण्यात आला असून ग्रामसभेला उपस्थित सर्व सभासदांच्या व ग्रामस्थांच्या सह्या हजेरी रजिस्टरमध्ये घेण्यात आल्या आहेत .

सदर ग्रामसभेला मोझर ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव उपस्थितीमध्ये सदरचा ठराव सर्वांनुमते स्विकृत झाला .यामुळे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे .शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाजुंने राज्यातील नागरिकही सोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर जुनी पेन्शन लागु होण्यास सहाय्य होणार आहे .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Join करा Whatsapp ग्रुप


Leave a Comment