कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते. आणि ती गुंतवणूक कमी व्हावी आणि त्यातून मिळणारा नफा हा जास्त असावा असे विचार लोक करीत असतात. लोकांची मागणी ही दिवसेंदिवस वाढत चालली असल्यामुळे अशा व्यवसायातून लोकांची कमाई ही चांगली होते.
आणि आपल्या व्यवसायातून चांगला नफा मिळवा यासाठी लोक प्रयत्न करीत असतात. तो व्यवसाय कोणता हे पुढे आपण जाणून घेऊया. कोणताही व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर आपण त्या व्यवसायाबद्दल परिपूर्ण विचार करून त्या व्यवसायाला सुरुवात करतो. असा व्यवसाय केल्याने आपल्याला किती नफा होतो हे जाणून घेणे आवश्यक असते. महत्वाची बाब अशी की चालू केलेल्या व्यवसायातून आपल्याला चांगला नफा होत नसेल तर आपण दुसरा व्यवसाय करण्याची तयारी करीत असतो. जरा तुम्हाला असा व्यवसाय करायचा की ज्याची मागणी जास्त आणि त्यामधून मिळणारा नफा सुद्धा जास्त आहे.
तर अशा व्यवसायाबद्दल आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करीत आहोत. तुम्ही तो व्यवसाय सुरू करताच तुमची मोठी कमाई सुरू होईल. शहरापासून खेड्यापर्यंत या उत्पादनाला जास्त मागणी आहे. हा व्यवसाय लापशी उत्पादन युनिटचा आहे. किरकोळ गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय करू शकता. आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने लापशी ही खूप पौष्टिक आहे.आरोग्याच्या दृष्टीने गव्हाच्या लापशीची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. गहु हा कॅलरीजचा महत्वाचा घटक आहे. त्यात कार्बोहायड्रेट आणि काही प्रमाणात प्रथिने असतात जे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतात.
पौष्टिक आणि चांगले पदार्थ खाण्यास तयार स्नॅक्स मागणी जास्त प्रमाणात वाढत आहे. जे सहज पचतात आणि आणि शरीर सुदृढ बनविण्यासाठी कमी वेळ लागतो. व्यावसायिक लापशी कशी बनते ते जाणून घेऊया. लापशी बनवण्यासाठी सर्वात पहिले गहु चांगले धुवून घ्यावे लागते.ते वाहत्या पाण्याखाली धुतले जाते. नंतर 5-6 तास मऊ होण्यासाठी पाण्यात भिजवून ठेवले जाते.ते मऊ झाल्यावर पाण्यातून काढून उन्हात वाढायला टाकावे लागते. वाळल्यानंतर ते पीठ गिरणीत बारीक दळून आणावे लागते.
उत्पादनातील वरचे जाळे पीठ भुसासोबत संपूर्ण गव्हापासून तयार होते. आणि त्याची लापशी तयार होते. या उत्पादनासाठी येणारा खर्च:खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने प्रधानमंत्री ग्रामोद्योग रोजगार योजनेत अंतर्गत लापशीची उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार हा व्यवसाय चालू करण्यासाठी तुमच्याकडे स्वतःची जमिन असणे आवश्यक असते. जर तुमच्याकडे जमीन नसेल तर तुम्ही ते भाड्याने घेऊ शकता.500 चौरस फूट जमिनीचे शेड बांधण्यासाठी एकूण 1 लाख रुपये खर्च येणार आहे. त्याचबरोबर उपकरणे खरेदी करण्यासाठी येणार खर्च हा 1 लाख रुपये राहील.
आणि 40,000 रुपये भांडवल खरेदी करण्यासाठी येईल. अशाप्रकारे येणारा खर्चाची किंमत ही 2,40,000 लाख रुपये राहील. या व्यवसायात मिळणारा मोबदला किती राहील: प्रकल्प अहवालानुसार,जर तुम्ही 100% क्षमतेच्या वापराने उत्पादन केले तर वर्षाचे उत्पादन 600 क्विंटल होईल.1,200 रुपये दराने त्याची किंमत 7,19,000 रुपये असेल. अंदाजाने विक्री खर्च रुपये 8,50,000 राहील.एकूण अधिशेष रुपये 1,31,000 राहील.अंदाजाने फक्त अधिशेष रुपये 1,16,000 म्हणजेच तुमचे वार्षिक उत्पन्न 1.16 लाख रुपये असेल.
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !