राज्य शासन सेवेतील लातुर शहर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबतचा नगर विकास विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.06.12.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबतचा सवितस्तर शासन निर्णय ( GR ) पुढीलप्रमाणे पाहुयात .
लातुर शहर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने दिनांक .29.08.2019 रोजी केलेल्या ठराव क्र .98 अन्वये केलेल्या शिफारशीनुसार लातुर शहर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना निर्णयामध्ये नमुद अटी व शर्तींच्या आधारे सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आल्या आहेत . यामधील प्रमुख अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत . सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्यात येणाऱ्या राज्य शासनाकडील संबंधित समकक्ष पदांना लागु करण्यात आलेल्या वेतनश्रेणीपेक्षा अधिक असणार नाहीत .
तसेच वेतनश्रेणीबाबत समकक्षता ठरविताना काही अडचणी आल्यास , शासनाच्या पुर्व मान्यतेने निराकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . व 7 व्या वेतन आयोगाचा लाभ केवळ मंजुर पदांवरील कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांनाच देण्याचे आदेशित करण्यात आलेले आहेत .तसेच सातव्या वेतन आयोगानुसारच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणीकरता वाढीव व दायित्वासाठी शासनामार्फत कोणतेही स्वतंत्र अनुदान देय असणार नाहीत .
सातवा वेतन आयोगानुसार निश्चित करण्यात येणाऱ्या वेतनश्रेणीप्रमाणे वेतन सुधारित करुन प्रदानाची कार्यवाही शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर येणाऱ्या पुढील महिन्यापासुन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .
कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये जॉइन व्हा
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !