शेती करत , करा हे बाजारपेठेमध्ये प्रचंड मागणी असणारे व्यवसाय गुंतवणुक खुपच कमी ,चांगला नफा मिळेल .

Spread the love

आपल्या देशात कृषिप्रधान अर्थव्यवस्था काही काळापासून प्रचलित आहे. त्यामुळे शेतीचे प्रमाण जास्त असल्यामुळे लोक शेती मोठ्या प्रमाणात करतात. परंतु काही शेतकरी शेतीसोबतच शेती पूरक व्यवसाय करतात. बाजारपेठेत ज्या वस्तूची मागणी जास्त आहे असे उत्पादन काढून व्यवसाय चालू करत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात नफा मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. तसेच आता खूप शेतकरी हे शेतीसोबतच अनेक व्यवसाय सुरू करताना दिसत आहेत.

आता शेतीसोबतच दुसर्‍या जोड व्यवसाय करणे काळाची गरज बनली आहे.व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो उद्योगाच्या स्वरुपात असो किंवा एखादा खाद्यपदार्थ बनविण्याच्या स्वरुपात असो परंतु तो चालू करणे फार गरजेचे असते. असे खूप लोक विचार करीत असतात आपण एखादा व्यवसाय करावा. परंतु कोणता व्यवसाय करावा याबद्दल विचार येते. एखादा व्यवसाय चालू केला तर त्यामध्ये गुंतवणूक कमी प्रमाणात व्हावी आणि नफा हा जास्त व्हावा असे विचार लोक करीत असतात.

अशा व्यवसायाच्या बाबतीत आपण जाणून घेऊया. यामध्ये आपण खाद्यपदार्थ या संबंधित व्यवसायाची निवड करूया. ज्यामध्ये आपण कमी प्रमाणात गुंतवणुक करून जास्त मोबदला मिळवू शकतो. आणि या व्यवसायाची मागणी सुद्धा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आहे. आता फरसाण म्हटले की कोणताही असा व्यक्ति नाही की त्याला आवडत नसेल, तर या व्यवसायाबद्दल आपण बघू की या पदार्थाची मागणी बाजारपेठेत कशा प्रकारे आहे याचा अंदाज आपण घेऊ शकतो. एखाद्या वेळेस नाश्त्यामध्ये तर कधी रात्री स्नॅक्स म्हणून फरसाण आवडीनं खाल्ले जाते. अशा प्रकारचा व्यवसाय चालू करायचा असल्यास त्याला मोठ्या प्रमाणात जागेची गरज नाही. 300 ते 400 चौरस फूट जागेवर तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता.

इतकेच नाही तर तुम्ही आपल्या घरातील एखाद्या खोलीमध्ये सुद्धा हा व्यवसाय चालू करू शकता. हा व्यवसाय चालू करण्यासाठी छोट्या स्तरापासून तर हळूहळू बाजारपेठ मिळवत मोठ्या स्तरापर्यंत सुरू करणे फार गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला काही रजिस्ट्रेशन करणे फार गरजेचे असते. जसे की फूड लायसन्स आणि एफएसएसआयचे रजिस्ट्रेशन यामध्ये लागते. या व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि इतर आवश्यक बाबी पुढीलप्रमाणे जाणून घेऊया. तुम्हाला कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते उत्पादन घेण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि कच्च्या मालाची आवश्यकता असते,कारण याशिवाय व्यवसाय चालू होऊ शकत नाही. आता फरसाण बनविण्याच्या व्यवसायात कच्च्या मालाचा विचार केला तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, डाळी, बेसन पीठ, तसेच तेल आणि शेंगदाणे याचा वापर करावा लागतो.

तसेच यामध्ये काही छोट्या यंत्राचीही गरज आहे. या व्यवसायाचे आर्थिक स्वरुप आपण लक्षात घेऊया. जर हा व्यवसाय छोट्या स्तरावर सुरू करायचा असेल तर येणारा खर्च हा 2 लाखापर्यंत राहील आणि मोठ्या स्तरावर चालू करायचा असेल तर 7 ते 8 लाखापर्यंत खर्च येतो. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास मिळणारा नफा हा 25 ते 30 % पर्यंत आहे. म्हणजेच 1 लाख गुंतवणुकीला 30% म्हणजेच 39 हजार याप्रमाणे 8% गुंतवणुकीला 30%म्हणजेच 1 महिन्यात 2 लाख 40 हजार रुपये आपल्याला या व्यवसायातून आर्थिक उत्पन्न मिळू शकते. परंतु या व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालण्यासाठी तुमच्या जवळ असलेल्या मालाचा दर्जा, चांगली साधन सामुग्री आणि बाजारपेठेचे स्वरुप यावर अवलंबून असते.

तसेच कोणताही व्यवसाय हा शून्यातूनच चालू होतो. मग एकदा बाजारपेठेत त्या वस्तूची मागणी वाढली की व्यवसायाच्या गतीचा सुद्धा वेग वाढतो. त्यासाठी आपले व्यवस्थापन आणि मार्केटिंग तसेच मालाचा दर्जा यावरही अवलंबून असते. एकदा जर तुमचा व्यवसाय बाजारात प्रसिद्ध झाला आणि तो उत्पादित माल लोकांच्या नजरेत भरला तर तुम्हाला फक्त दर्जा टिकवणे आणि लोकांचा विश्वास जिंकणे महत्वाचे असते. अशा पद्धतीने तुमचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होते. या व्यवसायात असलेल्या जोखमीचा विचार केला तर ती खूप कमी प्रमाणात आहे. अशा प्रकारे तुम्ही या व्यवसायात गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात नफा कमाऊ शकता.

Leave a Comment