Breaking News : जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे मा.उच्च न्यायालयाने दिले आदेश – Old Pension

Spread the love

सध्या देशांमध्ये जुनी पेन्शन हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला असतानाच , मा.मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ लागु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . सदरचा निर्णय मा.उच्च न्यायालयाने दि.18.11.2022 रोजी दिला असून , या संदर्भातील सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य शासन सेवेमध्ये अर्धवेळ शिक्षण सेवक व सहाय्यक शिक्षकांपैकी ज्यांना दि.01.11.2005 पुर्वी नियुक्ती मिळालेली आहे . अशा अर्धवेळ शिक्षण सेवक व सहाय्यक शिक्षक यांना 1982-84 ची जुनी पेन्शन ( Old Pension ) चा लाभ लागु करणेबाबत मा. मुंबई उच्च न्यायालयाने दि.18.11.2022 रोजी महत्वपुर्ण निर्णय दिला आहे .अर्धवेळ शिक्षण सेवक व सहाय्यक शिक्षकांनी मा.उच्च न्यायालयात जुनी पेन्शन मिळावी याकरीता याचिका दाखल केली होती .

सदर याचिकेवर दि.18.11.2022 रोजी सुनावणी होवून राज्यातील अर्धवेळ शिक्षण सेवक व सहाय्यक शिक्षक यांना जुनी पेन्शनचा लाभ लागू करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत .याचिका कर्त्यांची मूळ कागतपत्रे पडताळणी करीता प्रशासनाकडुन हालचाली सूरु करण्यात आलेल्या आहेत .या निर्णयामुळे राज्यातील अर्धवेळ शिक्षण सेवक व सहाय्यक शिक्षक यांना न्याय मिळाला आहे .

मा.उच्च न्यायालयाने या संदर्भात दिलेला आदेश डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

मा. उच्च न्यायालय आदेश


Leave a Comment