राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.09.12.2022

Spread the love

राज्य शासनाच्या वनसेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना वनसंरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल तसेच वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पदके देण्याबाबत महसुल व वन विभागांकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.09 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित झालेला आहे . महसुल व वन विभागाचा दि.09.12.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

सन 2019-20 या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या 6 कार्यप्रकारांसाठी पदके देण्याच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या प्रस्तावांची तपासणी केल्यानंतर संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे गोपनिय अहवाल , सचोटी, चारित्र्य , तांत्रिक कार्यक्षमता व त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान इत्यादी बाबी विचारात घेवून सदरहु प्रस्तावातील एकुण 23 अधिकारी / कर्मचारी यांना पदके देवून गौरविण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे .

सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांची नावे संबंधित शासन निर्णयच्या परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत .पदके देवून गौरविण्यात आलेले अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवापुस्तकात वरील बाबींची नोंद संबंधित विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी घेण्याचे आदेश सदर निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत .या संदर्भातील महसुल व वन विभागाचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Comment