राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबितच आहेत , या प्रलंबित विषयांवर हिवाळी अधिवेशनांमध्ये चर्चा होणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे .राज्यातील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न खुप दिवसांपासून प्रलंबित असून , राज्य शासनाकडुन या प्रश्नांवर हिवाळी अधिवेशनांमध्ये चर्चा होवून सकारात्मक निर्णय घेण्यात येतील .
जुनी पेन्शन योजना –
देशांमध्ये पाच राज्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन ,कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु केली आहे . यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसून येत आहे , कारण छत्तीसगढ सारख्या कमी बजेटच्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागु केली तर महाराष्ट्र राज्यांमध्ये का लागु करण्यात येत नाहीत .असा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांना पडत आहे .जुनी पेन्शन या मागणीकरीता राज्यातील कर्मचाऱ्यांचा दि.19.12.2022 पासुनच नागपुर येथे जुनी पेन्शन मागणीकरीता अधिवेशनांवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे .
सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष –
केंद्र सरकारबरोबर इतर 28 राज्यांनी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यास मंजुरी दिलेली आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवेचा लाभ मिळालेला असून , याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी राज्य कर्मचाऱ्यांकडुन बऱ्याच दिवसांपासून होत आहे . या मागणीवर देखिल अधिवेशनांमध्ये सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे .
महागाई भत्ता ( DA ) वाढ –
राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे माहे जुलै 2022 पासुन 38% महागाई भत्ता वाढ बाबतचा अधिकृत्त निर्णय हिवाळी अधिवेशनांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे .या निर्णयानंतर राज्य कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर महिन्यांच्या वेतनासोबत प्रत्यक्ष रोखीने महागाई भत्ता वाढ लागु करण्यात येईल .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !