कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधींचे वितरण करणेबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.09.12.2022

Spread the love

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे ऑक्टोबर , 2022 च्या वेतनासाठी रुपये 200.00 कोटी इतका निधी वितरीत करणेबाबत गृह विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील गृह विभागाचा दि.09.12.2022 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहूयात .

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे ऑक्टोबर , 2022 च्या वेतनासाठी सन 2022-23 मध्ये गृह विभागाच्या अर्थसहाय्य लेखाशिर्षाखाली केलेल्या तरतुदीमधून रुपये 200.00 कोटी एवढी रक्कम रोखीने प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे . सदर 200.00 कोटी हा खर्च सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून भागविण्यात यावा आणि सदर खर्च परिवहन आयुक्त आस्थापना परिवहन आयुक्त या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा असा आदेश देण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयन्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माहे ऑक्टोबर ,2022 च्या वेतनासाठी निधी वितरित करण्यात आला आहे . या संदर्भातील गृह विभागाकडुन दि.09 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय


Leave a Comment