LIC च्या या योजनेत एकाच वेळी प्रिमियम भरा व आयुष्यभर 52,000/- रुपये पेन्शन मिळवत रहा .जाणुन घ्या सविस्तर माहिती .

Spread the love

जसे जसे वय वाढत जाते तसे त्या उतरत्या वयात लोकांकडून कष्ट करणे फार कठिण जाते. त्यासाठी शासनाने नवीन योजना तयार केली आहे. या योजनेत एक वेळ पैसे भरल्यानंतर तुम्हाला सरकार 50 हजाराचे पेन्शन देणार आहे. तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते जाणून घेऊया. एखादा व्यक्ती सरकारी नोकरीवर असला आणि त्याची निवृत्ती झाल्यानंतर वाढत्या वयात त्याच्या कडून खूप मेहनत करणे होत नाही. त्यासाठी आपण काय करायचे असे प्रश्न त्याच्या मनात निर्माण होते.

त्यासाठी शासनाने एलआयसी पेन्शन योजना तयार केली आहे. कारण या योजनेत एक ठराविक रक्कम दर महिन्याला मिळते. त्यामुळे एलआयसी जीवन सरल योजना हा जीवनासाठी महत्वाचा मार्ग ठरू शकते. ही योजना तुम्हाला वाढत्या वयात दर महिन्याला एक ठराविक रक्कम देईल. या योजनेतून तुम्हाला वर्षाचे 6 महिने आणि 3 महिने अशी पेन्शन मिळवून देते. या योजनेत तुम्हाला आपला मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहेत.

एलआयसी जीवन सरल योजनेत 40 ते 80 वय असलेले व्यक्ति व्यवहार करू शकते. या योजनेत एक ठराविक रक्कम जमा करून तुम्ही प्रत्येक महिन्याला 50 हजार रुपये पेन्शन जमा करू शकता. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण यांचे निर्णय घेऊन ही योजना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे विमा धारकांना त्यांच्या गरजेच्या वेळी मोठी मदत मिळते. या योजनेत जेवढ्या मोठ्या रकमेचा व्यवहार केला तेवढी मोठी पेन्शन प्रत्येक महिन्याला आपल्याला मिळते.

जीवन सरल योजना एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावरून www.licindia.in वरून खरेदी करू शकता.तसेच एलआयसीच्या कोणत्याही कार्यालयातून, शाखेतून ऑफलाइन पद्धतीने तुम्ही विमा खरेदी करू शकता. या योजनेतून विमा धारकांना प्रत्येक महिन्याला 3 महिने, 6 महिने किंवा पूर्ण वर्ष पेन्शन मिळविता येते. जर एखाद्या व्यक्तिने या योजनेत 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला वर्षाचे 52 हजार रुपये पेन्शन मिळते. त्याला हे रक्कम दर महिन्याला सुद्धा घेता येते.

या योजनेत त्याला दर महिन्याला 12 हजार रुपये पेन्शन प्राप्त करता येते. अशा प्रकारे सरकारने एलआयसी जीवन सरल योजना तयार करून लोकांना पेन्शन देण्याचा प्रयत्न करत आहे.


Leave a Comment