जुनी पेन्शन मोहिम अधिक तिव्र करण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांची सभासद नोंदणी मोहिम ! अशी करा नोंदणी .

Spread the love

सध्या देशांमध्ये जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावर सत्तापालट होताना दिसत आहेत . तर एकीकडे महाराष्ट्र राज्यांमध्ये जुनी पेन्शनबाबत राज्य सरकारकडुन अद्याप कोणतीही भुमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही .यामुळे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत सभासद नोंदणी करण्याचे काम सुरु आहे .

दिनांक 19 डिसेंबर 2022 पासुन राज्य विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून , त्या निमित्ताने कर्मचाऱ्यांकडुन जुनी पेन्शनच्या मुद्द्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यासाकरीता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत सभासद नोंदणी अभियान सुरु करण्यात आली आहे . जेणेकरुन संघटनेला विविध कार्यक्रम , आंदालने व इतर कामाकरीता आर्थिक प्रश्नाला हातभार लागेल .

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.वितेश खांडेकर यांनी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना आव्हान केले आहे कि , सभासद नोंदणी करुन आपली एकता दाखवु व जुनी पेन्शन मिळवुच अशी अपेक्षा व्यक्त केली आहे . आंदोलन अधिक तिव्र करुन मागणी तात्काळ पुर्ण व्हावी याकरीता कर्मचारी सभासद नोंदणी करण्यास मोठ्या संख्याने प्रतिसाद देत आहेत .सभासद नोंदणी ऑनलाईन पद्धतीने देखिल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .

अशा पद्धतीने करा ऑनलाईन सभासद नोंदणी –

सभासद नोंदणी करण्याकरीता Click Here या लिंकवर क्लिक करा . या लिंकमधील सविस्तर माहिती भरुन , 100/- रुपये एवढी अत्यल्प नोंदणी शुल्क भरुन नोंदणी करु शकता .सभासद नोंदणी केल्यानंतर आपल्याला आपल्या नोंदणी केलेल्या ई – मेल वर प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे .सभासद नोंदणी संघटनेच्या कार्यालयामध्ये , ऑफलाईन पद्धतीने देखिल उपलब्ध आहे .

सभासद नोंदणी करण्याकरीता काही तांत्रिकी अडचणी येत असल्यास खालील चार्टमध्ये नमुद पदाधिकाऱ्यांना संपर्क करु शकता .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा


Leave a Comment