आनंदाची बातमी ! जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत राज्य सरकारकडुन प्रस्ताव तयार !

Spread the love

जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे , ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेसंदर्भात राज्य सरकारकडुन प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे .हा प्रस्ताव हिमाचल प्रदेश राज्य सरकारकडुन तयार करण्यात येणार आहे .

केवळ जुनी पेन्शन या मुद्द्यावर कर्मचाऱ्यांनी एकहाती काँग्रेसची सत्ता आणली असल्याने , राज्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्यांनेच काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्याची वृत्त मिडिया रिपोर्ट नुसार समोर आली आहे .यामुळे हिमाचल प्रदेश राज्य कर्मचाऱ्यांना तात्काळ जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येणार असून , याकरीता तात्काळ समिती गठीत करण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे .

याबाबत खुद्द राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी तात्काळ जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्य पदाधिकाऱ्यांना संबोधित केले आहेत . हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर सुखविंद्र सुक्खू तर उपमुख्यमंत्री पदावर अग्निहोत्री स्थानापन्न झालेले आहेत . आज दि.11.12.2022 रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी कार्यक्रम होणार आहे .

जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , हिमाचल प्रदेश सरकारकडुन समिती गठित करण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे . जुनी पेन्शन योजना लागु करण्याचा प्रस्ताव तात्काळ तयार करुन , लवकरात लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याने , हिमाचल प्रदेश राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासुनची प्रतिक्षा अखेर संपली आहे .

Leave a Comment