सरकारने नवीन योजना अमलात आणली आहे. आपल्या देशातील लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण व्हाव्या त्यांच्या मध्ये कोणत्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी शासना नवीन योजना तयार करून गरीब लोकांना आर्थिक सहाय्य करीत असतात. आजकालचे कोणतेही काम हे इलेक्ट्रॉनिक उपकरणाशिवाय होत नाही. काहीही काम असले तरी इलेक्ट्रिकचा वापर होतोच.
आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असल्याने कोणतीही गोष्ट तंत्रज्ञानाशिवाय होत नाही. जास्त तंत्रज्ञानाचा वापर केला तर जास्त बिल जळते.त्यासाठी सरकारने सोलर पॅनलची योजना तयार केली आहे. जेणेकरून कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरले तर तुम्हाला जास्त बिल येणार नाही. तर आपण या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते जाणून घेऊया. भारत सरकारने सोलर पॅनल योजना अमलात आणून लोकांना 25 वर्षे वीजपुरवठा निर्माण करण्याचे सहकार्य करीत आहे.
आपल्या घरावर सोलर पॅनल बनवण्यासाठी सरकार सबसिडी देत आहे. इलेक्ट्रिकवर चालणार्या वस्तू या सर्व सोलर पॅनलवर चालून विजेची बचत होईल.हा उपक्रम सरकारने चांगल्या प्रकारे राबविला आहे. अशीच 1 योजना सरकारने काढली होती ती म्हणजे सौर पंप बनवण्यासाठी सरकारने अनुदान दिले होते. घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी, नवीन मंत्रालय आणि नवीकरणीय ऊर्जा, भारत सरकार ग्रीड- कनेक्टेड रूफटाँप सोलर लागु करीत आहे.
केंद्र सरकारने ऊर्जा मंत्रालयाच्या सौर ऊर्जा योजना अंतर्गत महावितरण यासाठी 25 मेगावॉटचे उद्दिष्टे मंजूर केले घराच्या छतावर ग्राहकांना 1 किलो वॉटचे सौर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी सरकारकडून अनुदान देण्यात येते आहे. यामध्ये घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलो मीटर पर्यंत 40 टक्के अनुदान तसेच 3 किलो पेक्षा अधिक ते 10 पर्यंत 20 टक्के अनुदान देण्यात येत आहे.
यातच सामूहिक वापरासाठी 500 किलो वँट पर्यंत 20 टक्के परंतु प्रत्येक घरासाठी 10 किलो वँट मर्यादेमध्ये गृहनिर्माण रहिवासी संस्था आणि निवासी कल्याणकारी संघटना या ग्राहकांना 20 टक्के अनुदान दिले जात आहे. अशा प्रकारे आपण सोलर पॅनल आपल्या घराच्या छतावर बसुन विजेची बचत करू शकतो. आणि 25 वर्ष मोफत विजेचा वापर करू शकता.
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !