राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि.31 डिसेंबर 2022 पर्यंत कार्यवाही करण्याचे दिले आदेश !

Spread the love

राज्य शासन सेवेतील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचे परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजनेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतनातुन कपात झालेली रक्कम व शासनाचा देय हिस्सा यांच्या हिशोबाच्या पावत्या देण्याबाबतची कार्यवाही दि.31 डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय , पुणे यांच्या कडुन एक अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक दि.09 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित झाले आहेत .

राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदाय निवृत्तीवेतन योजनेतुर राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्याची कार्यपद्धती शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग दिनांक 19.09.2019 अन्वये विहीत करण्यात आलेली आहे .दि.07.12.2022 रोजी मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्य बैठकीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कर्मचारी कपाती , शासन हिस्सा व त्यावरील व्याजाची परिगणना करुन चिठ्ठ्या वाटप करुन सदरची रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन खात्यावर जमा करणेबाबतची कार्यवाही डिसेंबर 2022 पर्यंत पुर्ण करण्यात यावी असे निर्देश दिलेले आहेत .

जर सदर कार्यवाही दि.31 डिसेंबर 2022 पर्यंत पुर्ण न झाल्यास संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .तसेच NPS योजनेत वर्ग करण्यासाठी आवश्यक अनुदानाची माहीती हिशोब पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र दि.31.12.2022 पर्यंत संचालनालयास तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भातील प्राथमिक संचालनालया यांचे दि.09.12.2022 रोजीचे सविस्तर शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन परिपत्रक

Leave a Comment