Bank of Maharashtra : तरुण वर्गासाठी सुवर्णसंधी! बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये होणार आहे ह्या पदावर भरती; आजच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा .

Spread the love

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, जर तुम्ही बँकेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न बघत असाल तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेने स्केल दोन, तीन, चार आणि पाच यासाठी स्पेशलिस्ट ऑफिसर भरती ची सूचना जाहीर केली आहे व लवकरच ही भरती घेण्यात येईल.

या भरतीमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर एस ओ भरती करिता पात्रता पूर्ण केलेले सर्व उमेदवार सहा डिसेंबर 2022 पासून ते 23 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. या पदांकरिता अर्ज करणाऱ्या सर्वच उमेदवारांनी भरती संबंधित संपूर्ण माहिती वाचून घ्यावी त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी पुढील प्रक्रिया करणे गरजेचे आहे.

पोस्ट बद्दल आणखी सविस्तर माहिती

1) स्केल II मध्ये सामान्य अधिकारी एकूण चारशे पदे आहेत.
2) स्केल III मध्ये सामान्य अधिकारी साठी एकूण शंभर पदे आहेत.
3) फॉरेक्स / ट्रेझरी ऑफिसर साठी एकूण 25 पदे आहेत.
4) मुख्य व्यवस्थापक क्रेडिट साठी एकूण 15 पदे आहेत.

शैक्षणिक पात्रता

स्किल दोन मधील सामान्य अधिकारी पदासाठी तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. यासोबतच सर्व सेमिस्टर किंवा वर्षाच्या कमीत कमी 60% असते आवश्यक आहे.

स्केल दोन मधील सामान्य अधिकारी पदासाठी सर्व सेमिस्टर किंवा एकूण वर्षाच्या 60 टक्के गुण कमीत कमी असणे गरजेचे आहे. यासोबतच पाच वर्षाचा अनुभव देखील असावा एससी एसटी ओबीसी या कास्ट मध्ये विद्यार्थ्यांसाठी 55 टक्के गुण आवश्यक आहेत.

बँकिंगमधील पीजी पदवी किव्हा वित्त किव्हा व्यवस्थापन किव्हा व्यवसाय आणि ट्रेझरी ऑफिसर- सर्व सेमिस्टर किव्हा फॉरेक्स वर्षात 60% गुणांसह पदवी आणि 4 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

Leave a Comment