शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या योजनेच्या माध्यमातून शेतमजुरांना मिळणार दोन लाख रुपयांचा लाभ; चला बघूया अर्ज कसा करावा !

Spread the love

E Shram Card : केंद्र सरकारच्या माध्यमातून भारत देशामधील गरीब नागरिकांसाठी नेहमीच विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. आता देशामधील असंघटित क्षेत्रांमधील सर्व मुजरांना एकत्र जोडण्याकरिता शासनाने ई-श्रम कार्ड योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र मुजरांना शासन मदत करणार आहे. यासोबतच या योजनेच्या माध्यमातून कामगार वर्गाला विम्याचा लाभ देखील भेटेल.

ई-श्रम कार्ड या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंतचा विमा दिला जातो, आता नक्की याचा फायदा घ्यायचा तरी कसा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला शासनाच्या पोर्टलवर नोंद करावी लागेल. मजुरांसोबतच सर्वसामान्य नागरिक त्यासोबतच विद्यार्थी गरीब कुटुंबातील लेबर देखील या योजनेअंतर्गत नोंदणी करू शकणार आहेत.

जास्त उत्पन्न असलेल्या वर्गांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. तर आता या योजनेची नोंदणी कशी करायची यासोबतच आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे कोणकोणती असली पाहिजे याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेऊया.

अशाप्रकारे ई-श्रम कार्ड काढून घ्या!

1) ई-श्रम कार्ड काढण्याकरिता सर्वात प्रथम तुम्हाला शासनाच्या https://eshram.gov.in/ ह्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.

2) ह्या वेबसाईट वरती गेल्यानंतर सर्वात प्रथम रजिस्टर ऑन ई श्रम कार्ड या पर्यायावर क्लिक करावे.

3) या ठिकाणी सेल्फ रजिस्ट्रेशन असा पर्याय दिसेल त्या पर्यायांमध्ये आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि कॅपच्या कोड टाकून आत मध्ये प्रवेश करायचा आहे.

4) आपण EPFO आणि ESIC चे सदस्य नसाल तर त्या ठिकाणी no पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर ओटीपी सेंड ह्या पर्यायावर क्लिक करा.

5) यानंतर मित्रांनो आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक आहे त्यावर एक ओटीपी येईल तो ओटीपी खालील दिलेल्या रकान्यात टाकून घ्या.

6) त्यानंतर पुढे तुमचा स्वतःचा आधार कार्ड क्रमागत टाकावा लागेल, यानंतर आणखी एकदा कॅपच्या कोड ठिकाणी भरायचा आहे.

7) यानंतर “I agree to the terms and conditions for registration under e-sram portal” असा पर्याय त्या ठिकाणी दाखवला जाईल त्या पर्यायासमोर क्लिक करावे आणि शेवटी सबमिट करून घ्या सबमिट केल्यानंतर आणखी एक ओटीपी तुमच्या नंबर वरती पाठवला जाईल तो ओटीपी त्यामध्ये टाकून नंबर व्हॅलिडेट करून घ्या.

8) त्यानंतर तुमच्या स्क्रीन वरती आधार कार्ड तपशील दाखवला जाईल त्या ठिकाणी सर्व तपशील बरोबर आहे या पर्यायावर क्लिक करायचे आहे यानंतर कंटिन्यू टू ऑदर डिटेल्स असा पर्याय दिसेल ह्या पर्यायावर क्लिक करा.

9) आता त्या ठिकाणी तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला भरायची आहे, यासोबतच तुम्ही कोणाला नॉमिनी लावणार आहे याची देखील माहिती भरायची आहे यानंतर सेव्हड अँड कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

10) यानंतर मित्रांनो तुमच्या रहिवासीचा संपूर्ण तपशील त्या ठिकाणी तुम्हाला भरावा लागेल आणि त्या ठिकाणी तुमचा परमनंट ऍड्रेस देखील टाकायचा आहे त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करा.

11) यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक माहिती भरावी लागेल शैक्षणिक माहिती भरली की नंतर सेव्ह अँड कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करा.

12) यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या व्यवसाय संबंधित माहिती भरावी लागणार आहे व्यवसाय संबंधित माहिती भरल्यानंतर तुमच्या बँकेची डिटेल्स त्या ठिकाणी टाकून नमूद करावे लागतील बँक डिटेल टाकल्यानंतर सेव अँड कंटिन्यू पर्यावर क्लिक करा.

13) त्यानंतर तुम्ही भरलेले संपूर्ण माहिती तुमच्यासमोर येईल तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती बरोबर आहे असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर शेवटी क्लिक करा.

14) ही प्रक्रिया संपूर्ण केल्यानंतर तुमच्या स्क्रीन वरती ईश श्रम कार्ड दाखवले जाईल ते ईश श्रम कार्ड त्या ठिकाणी डाऊनलोड करून घ्या.

नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?

जर तुम्ही यामध्ये पात्र असाल आणि तुम्हाला नोंदणी करायची असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला आधार कार्ड लागेल, पासपोर्ट आकाराचे फोटो, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, यासोबत इत्यादी कागदपत्राचे आवश्यक असणार आहेत. ही कागदपत्रे तुमच्या जवळ नसतील तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नोंद करू शकणार नाही.

Leave a Comment