सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षांमध्ये आणखी 5% वाढणार DA !

Spread the love

कर्मचाऱ्यांचा DA वाढवला की त्यांच्या पगारात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होते . नवीन वर्ष चालू सुरू व्हायला 15 दिवस बाकी आहेत. तर येणार्‍या नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. नवीन वर्षात 2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे.

मीडिया रीपोर्टनुसार,आतापर्यंत आलेल्या AICPI इंडेक्सच्या डेटानुसार,सरकार पुढल्या वर्षी मार्च महिन्या पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 ते 5 टक्क्याने वाढ करू शकणार आहे. या टक्क्यांमध्ये वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होते. कर्मचाऱ्यांचा DA 5% पर्यंत वाढू शकते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38% DA मिळतो.जर सरकारने पुढील वर्षी 2023 मध्ये 3 ते 5 टक्के महागाई भत्ता वाढवला तर DA 41 ते 43 टक्केच्या दरम्यान वाढतो. उदाहरणार्थ.समजा एखाद्याचा मूळ पगार 20,000 हजार रुपये असेल, तर त्याला 38 टक्के दराने सध्या 7,600 रुपये DA मिळत असेल. जर DA 5 टक्क्याने वाढला तर पगारातील DA चा भाग 8,600 रुपये होईल. म्हणजेच पगारात 1000 रुपये वाढून वर्षात 12,000 हजार रुपये वाढ होईल.

कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता AICPI इंडेक्सच्या डेटावर आधारित असतो. जर या इंडेक्सचा डेटा वाढला तर त्याच प्रमाणावर DA सुद्धा वाढतो. सप्टेंबर 2022 मध्ये, AICPI चा आकडा 131.3 होता,ज्यात ऑक्टोबर मध्ये 1.2 अंकांनी वाढ झाली आणि 132.5 वर पोहोचला. त्यानंतर सरकारने दिवाळीच्या अगोदर DA मध्ये 4 टक्क्याने वाढ केली. सरकारकडून जानेवारी आणि जुलै असा वर्ष भरात 2 वेळा महागाई भत्ता वाढवला जातो .या वर्षीच्या सुरवातीला मार्चमध्ये सरकारने DA मध्ये 4 टक्क्याने वाढ केली होती.

त्यानंतर दिवाळी अगोदर सरकारने DA मध्ये 4 टक्क्याने वाढ केली होती. दिवाळी अगोदर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाल्याने त्यांना खूप समाधान मिळाले आहे.

Leave a Comment