महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लाभ पुर्ववत लागु करणेबाबत आत्ताची मोठी महत्वाची अपडेट ! पत्रक निर्गमित !

Spread the love

महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना 1982-84 ची जुनी पेन्शनचे लाभ पुर्ववत लागु करणेसाठी 25 ते 27 डिसेंबर 2022 या काालावधीत सेवाग्राम ते नागपुर विधान भवन पायी पेन्शन मोर्चा करत असलेबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र सादर करण्यात आले आहे . या संदर्भातील संघटनेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला सविस्तर प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्यात दि.01 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना 1982 -84 ची जुनी पेन्शनचे सर्व लाभ बंद करण्यात आले आहेत . त्यातल्या त्यात त्यांना लागु करण्यात आलेल्या नव्या पेन्शन योजनेतूर त्यांना मृत्यू व सेवानिवृत्ती नंतर कोणतीही पेन्शन मिळताना दिसत नाही .त्यामुळे राज्यातील असंख्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या मृत्यू व सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनज्ञापनाबाबत अतिशय असुरक्षितता निर्माण झाली आहे .

ज्यातुन कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविषयी असंतोष वाढत असुन , महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा राजस्थान , छत्तीसगढ , पंजाब , व झारखंड सरकार प्रमाणे जुन्या पेन्शनचे सर्व लाभ लागू करुन त्याचे मृत्यु व सेवानिवृत्ती नंतरचे भविष्य सुरक्षित करणे गरजेचे आहे .

कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना वतीने दि.25 डिसेंबर 2022 रोजी सेवाग्राम ते बट्टेबोरी बाईक रॅली व दि 26 ते 27 डिसेंबर 2022 बुट्टेबोरी पासून विधान भवन नागपुर पर्यंत पायी पेन्शन मोर्चा करण्यात या बाईक रॅली व पायी पेन्शन मोर्चा मध्ये राज्य भरातुन लाखो कर्मचारी सहभागाी होणार आहेत .या संदर्भातील संघटनामार्फत निर्गमित झालेला सविस्तर प्रसिद्धीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

प्रसिद्धीपत्रक

Leave a Comment