राज्यातील या कर्मचाऱ्यांना वेतनाच्या समान टप्यावर समायोजनाबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.12.12.2022

Spread the love

राज्यातील शैक्षणिक संस्थामधील अंशत: अनुदानित रिक्त पदांवर वैयक्तिक मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांचे वेतनाच्या समान टप्यावर समायोजनाबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभागामार्फत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा दि.12.12.20222 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

सन 2022-23 च्या संचमान्यतेनुसार पद कमी झाल्याने सेवा समाप्त होणाऱ्या वैयक्तिक मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांचे समायोजन निर्णयांमध्ये नमुद अटी व शर्तीच्या अधिन राहुन शासन मान्यता देण्यात येत आहे .यामध्ये प्रमुख अटी याप्रमाणे आहेत , आयुक्त यांचय स्तरावर प्रथम राज्यातील रिक्त व अंशत: अनुदानित पदाचा आढावा घेण्यात येणार आहे .त्यानंतर सन 2022-23 च्या संचमान्यतेमध्ये पद कमी झाल्याने सेवा समाप्त होणाऱ्या वैयक्ति मान्यता प्राप्त अंशत : अनुदानित शिक्षकांची जेष्ठता सूची आयुक्तांकडुन तयार करण्यात येणार आहे .

वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशत:  अनुदानित कर्मचाऱ्यांचे समायोजन केवळ अनुदानाच्या समान टप्यावर पद उपलब्ध असल्यास अनुज्ञेय असणार आहे , मात्र अनुदानाच्या टप्याचे पद उपलब्ध नसल्यास सदर कर्मचाऱ्यांचे समायोजन कुठल्याही परिस्थितीत करता येणार नाही .तसेच समान टप्यावर पद उपलब्ध नसल्यास समायोजन करता येणार नाही व कुठल्याही परिस्थितीत अनुदानाचा टप्पा बदलून समायोजन करता येणार नाही .

या संदर्भाती शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा दि.12.12.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा  

शासन निर्णय

Leave a Comment