महाराष्ट्र राज्य शासनाची दि.13.12.2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली . या मंत्रीमंडळ राज्याच्या कल्याणाकरीता् विविध लाभदायक निर्णय घेण्यात आलेले आहेत . यापैकी राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात .
1585 रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणार
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील 1585 रोजंदारी व तासिका कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा मोठा सकारात्मक निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आला आहे .शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिका आणि सर्वोच्च न्यायालयाने दि.29 जुलै 2022 रोजी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी वरील नमुद रोजंदारी / तासिका कर्मचाऱ्यांना दि.01 नोव्हेंबर 2022 पासून नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .सदर कर्मचाऱ्यांना सेवा नियमित करण्याच्या दिनांकापासून सर्व प्रत्यक्ष लाभ अनुज्ञेय असणार आहेत .
राज्यातील शाळांना अनुदानासाठी 1100 कोटीच्या खर्चास मान्यता –
राज्यातील शाळांना अनुदानासाठी 1100 कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आल्याने 6 हजार 10 प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तसेच 14 हजार 832 तुकड्यांना अनुदान उपलब्ध होणार आहे .तसेच या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 63,338 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना होणार आहे .तसेच 20 टक्के अनुदान घेत असलेल्या 228 शाळांना 40 टक्के अनुदान मिळणार तर 40 टक्के अनुदान घेत असलेल्या 2009 शाळांना 60 टक्के अनुदान देण्यात येणार आहे .
कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी जॉइन करा Whatsapp ग्रुप
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !