चीन मध्ये पुन्हा कोरोना व्हायरसला सुरुवात झाली आहे. चीन मधील रुग्णालयात या रोगामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. कोरोना व्हायरस या रोगाचे प्रकरण झपाट्याने वाढत आहे. झिरो कोविड पाॅलिसी मध्ये दिलेली शिथिलता हे यंत्र रोगामागचे प्रमुख कारण आहे. अनेक ठिकाणी गांभीर समस्या निर्माण होऊन रुग्णालयात गर्दीचे वातावरण निर्माण झाले आहे.मीडिया रीपोर्ट नुसार, चीनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की राजधानी बीजिंगमध्ये कोरोना व्हायरसचे प्रमाण वाढत असल्यामुळे प्रशासनाने कोरोना निर्बंध शिथिल करण्यास सांगितले आहे.
कोरोनाचे वातावरण पूर्ण देशात पसरल्यामळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरस वाढल्याने बीजिंग रुग्णालयात सुद्धा रुग्णांची संख्या वाढत आहे. एएफपीच्या रिपोर्टमध्ये अधिकार्यांना असे सांगितले गेले होते की,काही दिवसाअगोदर बीजिंग शहरात 22 रुग्णांची रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. तेव्हा रुग्णांची संख्या 16 पटीने कमी होती. शहराच्या आरोग्य आयोगाचे प्रवक्तेला सोमवारी एका ब्रिफिंगमध्ये सांगितले की बीजिंग मध्ये साथीच्या रोगाचे प्रसारण मिथ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. ताप आणि फ्लू या रोगामुळे रुग्णालयात रुग्णांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.
आपत्कालीन कॉलची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे. मीडिया रिपोर्ट नुसार सोमवारी चीन मध्ये कोरोना व्हायरसचे 8,622 रुग्ण आढळून आले आहे. परंतु कमी चाचणी घेण्यात आल्यामुळे हा आकडा खूप मोठा वाटत आहे. येथे महत्वाची गोष्ट अशी आहे की झिरो कोविड पाॅलिसी शिथिल केल्या नंतर काही छोटी- मोठी लक्षणे आढळत असल्यामुळे डॉक्टर घरी जाऊन त्यांच्यावर उपचार करीत आहे. आरोग्य सल्लागार झोंग यांनी चीनी सरकारला कोरोना व्हायरस याबद्दल सविस्तर माहिती दिली होती.,ते म्हणाले ओमायक्राॅनच म्युटेशन खूप संसर्गजन्य आहे आणि एक व्यक्ती 22 लोकांपर्यंत हा रोग पसरवू शकते. उच्च आरोग्य अधिकारी पुढे म्हणाले की, चीनमध्ये साथीच्या रोगा मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत प्रतिबंध आणि नियंत्रण कितीही कडक असले तरी या रोगाचा सामना करणे खूप कठीण आहे.
राष्ट्रीय आरोग्य आरोग्याच्या वैद्यकीय व्यवहार विभागाचे संचालक जिओ याहूई यांनी चेतावणी दिली की देशात 10,000 लोकांसाठी फक्त 1 अतिदक्षता युनिट बेड आहे. ते म्हणाले की 1,06,000 डॉक्टर आणि 1,77,700 नर्स यांना कोरोना व्हायरस वाढल्याने त्या रोगाला तोंड देऊन त्याचा सामना करून रुग्णांना ICU मध्ये सेवा दिली जाईल.कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर 3 वर्षानी चीन मध्ये निर्बंध शिथिल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूर्ण चीन मध्ये वैद्यकीय सोयी ठप्प झाल्या आहेत.औषधीच्या दुकानासमोर लोकांची मोठी रांग लागली आहे. ही दुकाने लोकांच्या गरजाही पूर्ण करू शकत नाही. चीन मध्ये अशा परिस्थितीत खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिस्थिती इतकी खराब आहे की लोकांना औषधीसाठी वैद्यकीय सोयी उपलब्ध करण्यासाठी इकडे तिकडे फिरावे लागत आहे. जिथे माल उपलब्ध आहे तिथे किंमत सुद्धा जास्त आहे. स्थानिक प्रशासनाने सारखे पणा किंवा कोणतेही लक्षण नसलेल्या होम क्वारंटाइन करण्याची परवानगी दिली आहे. लोक एका गावातून दुसर्या गावात सहजतेने प्रवास करत आहे.
आता भरपूर प्रमाणात औषध उपलब्ध करून आरोग्य यंत्रणा कडक केली आहे. चीनचा दावा आहे की पुरवठा लाईन मधील समस्या दूर होईल. त्यामुळे लोकांच्या अडचणी कमी होऊन औषधांची सोय भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल. जनतेनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. अशा प्रकारच्या सोयी उपलब्ध करून रुग्णांना मोठ्या प्रमाणात निरोगी करण्यात आले आहे.
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !