राज्य कर्मचाऱ्यांना सेवाविषयक विविध लाभ लागु करणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.13.12.2022

Spread the love

राज्यातील अशासकीय अनुदानित कला संस्थामधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ लागू करण्याबाबत , उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.13.12.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्यातील अशासकीय अनुदानित कला संस्थामधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 मधील सर्वसाधारण तरतुदी लागु करण्याचा निर्णय क्र.2711 दि.03.10.2018 रोजी निर्गमित करण्यात आला आहे .तसेच वर्ग – 3 व वर्ग – 4 च्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती योजना लागु करणे तसेच अध्यापकीय पदांना द्विस्तरीय / त्रीस्तरीय वेतनश्रेणी लागु करणे , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचे रोखीकरण लागु करणे , महिला शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रसुती रजेसंदर्भातील तरतुदी लागु करणे , तसेच शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत लाभ देणे या बाबत शा.नि.दि.19.04.2022 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत .

या उपरोक्त शासन निर्णयांचा प्रत्यक्ष लाभ ,अनुदानित कला संस्थामधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दि.05.10.2017 पासून अनुज्ञेय करण्यात येत आहे .अशासकीय अनुदानित कला संस्थामधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या पात्र कुटुंबियांना शालेय शिक्षक विभागाने लागु केल्यानुसार अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा लाभ दिनांक 05.10.2017 पासून अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात येत आहे .या संदर्भातील सविस्तर सेवाविषयक लागु करणेबाबत विविध निकष पाहण्याकरीता खालील शासन निर्णय डाऊनलोड करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक ,भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये जॉईन व्हा

Leave a Comment