राज्यातील शासकीय , जिल्हा परिषदा ,व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीबाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे .राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीबाबतचा निर्णय त्वरीत घेण्याकरीता वित्त विभागांकडुन अंतिम स्वरुप देण्यात येत आहे .
राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांना केंद्रीय कर्मचारी प्रमाणे माहे जुलै 2022 पासुन चार टक्के डी.ए वाढीचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे . डी.ए वाढीचा निर्णय हा राज्याच्या हिवाळी अधिवेशनांमध्ये घेण्यात येणार असल्याची आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे .राज्य विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 19 डिसेंबर पासुन नागपुर येथे सुरु होणार आहे .या अधिवेशनांमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे .
मिडीया रिपोर्टकडुन मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी यांना माहे डिसेंबर महिन्याच्या वेतन / पेन्शन सोबत डी.ए वाढीचा लाभ अनुज्ञेय करण्यात येईल . शिवाय माहे डिसेंबर महिन्याच्या वेतन / पेन्शनसोबत माहे जुलै 2022 पासुन ते माहे नोव्हेंबर 2022 पर्यंचा डी.ए फरकाची रक्कम देखिल मिळणार आहे .
वित्त विभागांकडुन सदर डी.ए वाढीच्या प्रस्तावाला अंतिम स्वरुप देण्याचे काम सुरु असून , येत्या अधिवेशन कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे ,4 टक्के महागाई भत्ता वाढीची मोठी घोषणा करतील .
कर्मचारी विषयक / भरती , योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !