राज्य / केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना महामारीच्या काळामध्ये , ओढावलेले आर्थिक संकटाचा विचार करुन , 01 जानेवारी 2020 ते 01 जुलै 2021 या कालावधीमधील डी.ए व डी. आर वाढ बंद करण्यात आलेली होती .त्यानंतर 01 जुलै 2021 पासुन सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 11 टक्केंची वाढ करण्यात आली , परंतु वरील नमुद 18 महिने कालावधी मधील डी.ए थकबाकी मिळाली नाही .या संदर्भात आत्ताची मोठी ब्रेकिंग न्युज समोर आलेली आहे .
18 महिने कालावधीमधील महागाई भत्ता थकबाकी संदर्भात लोकसभा सदस्याने प्रश्न विचारला असता , केंद्रीय वित्त राज्य मंत्री श्री.पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले कि , कोरोना कालावधीमध्ये ,आलेल्या आर्थिक संकटामुळे कर्मचाऱ्यांचा 18 महिने कालावधीकरीता महागाई भत्ता गोठविण्यात आला होता . 18 महिने कालावधीमधील डी.ए थकबाकी अदा करण्यात यावी या संदर्भात विविध संघटनांकडुन निवेदने केंद्र सरकारला प्राप्त झालेली आहेत .
कोरोना साथीच्या रोगाचा प्रतिकूल आर्थिक परिणाम आणि सरकारने केलेल्या कल्याणकारी उपायांच्या वित्त पुरवठ्यात आर्थिक वष – 2020-21 नंतरही आर्थिक गळती असल्याने , सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिने कालावधीमधील DA/DR थकबाकी देण्यास उचित वाटत नसल्याचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री.पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले आहे .
यामुळे कर्मचाऱ्यांकडुन नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे , परंतु संघटनामार्फत आणखीण पाठपुरावा करुन थकबाकी देणे सरकारला भाग पाडु असे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासने दिले आहेत .
कर्मचारी विषयक / भरती , योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !