वैद्यकिय खर्च प्रतिपूर्तीकरीता विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या तिच्या आई – वडीलांची किंवा तिच्या सासू – सासऱ्यांची निवड करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.14.12.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .
विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याने तिचे आई – वडील किंवा सासू – सासरे या दोघांपैकी एकाच्या वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचा लाभ घेण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीकरीता निवड केली आहे , असे अर्जाद्वारे ती कार्यरत असलेल्या कार्यालययास लेखी कळविणे बंधनकारक आहे . तसेच संदर्भात अर्ज प्राप्त झाल्यावर संबंधित कार्यालयाने त्या महिला शासकीय कर्मचाच्या सेवापुस्तकात अर्जाबाबत दिनांकासहीत नोंद घेणे बंधनकारक असणार आहे .
विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्यास तिने आई – वडील किंवा सासू – सासरे या दोघांपैकी एकाची निवड वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीचा लाभ घेण्यासाठी लाभ घेण्यासाठी ती करीत आहे , असे ज्या दिनांकास कळविले आहे . त्या दिनांकापासून केवळ पुढील कालावधीत संबंधितांनी (आई – वडील किंवा सासू – सासरे या दोघांपैकी एक ) घेतलेल्या वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची प्रतिपुर्ती शासनाकडुन करण्यात येईल .
विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी सदर वरील नमुद नोंद करणे आवश्यक आहे .एकदा पर्याय निवडल्यानंतर सेवा कालावधीमध्ये त्याच्यात कसलाही बदल करता येणार नाही . या संदर्भातील सार्वजनिक विभागाकडुन निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !