राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना विमान प्रवास सवलत अनुज्ञेय करणेबाबत , वित्त विभागाकडुन GR निर्गमित ! दि.16.12.2022

Spread the love

राज्य शासन सवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना विमान प्रवास सवलत अनुज्ञेय करण्याबाबत वित्त विभागांकडुन दि.16.12.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .या संदर्भातील वित्त विभागाचा दि.16.12.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

न्यायालयीन व विधीमंडळाशी संबंधित कामकाजाव्यतिरिक्त अन्य अत्यावश्यक शासकीय कामकाजासाठी मंत्रालयीन / क्षेत्री अधिकारी व कर्मचाऱ्यांना विमान प्रवास करण्यास परवानगी देण्यात येत आहे . यामध्ये अन्य कोणत्याही साधानाने / मार्गाने नियोजित ठिकाणी विहीत वेळेत पोहोचणे शक्य नसल्यास संबंधित प्रशासकीय विभागाच्या सचिवांची पुर्वपरवानगी घेवून विमान प्रवास करता येणार आहे .तसेच परतीच्या प्रवासासाठी ही सवलत अनुज्ञेय असणार नाही .अपवादात्मक परिस्थितीत परत येणे तातडीचे असले तर संबंधित विभागाच्या सचिवांची लेखी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे .

सदर प्रवास हा अल्प दराने सेवा पुरविणाऱ्या विमान कंपन्यांच्या विमानाने व इकॉनॉमी क्लासनेच करणे आवश्यक असणार आहे .तसेच बिझानेस / एक्झाीक्युटीव्ह क्लासने करण्यात आलेल्या विमान प्रवासाच्या खर्चाची प्रतिपुर्ती अनुज्ञेय ठरणार नाही .या संदर्भातील वित्त विभागाकडुन दि.16.12.2022 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर ‍क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment