8 th pay Commission update : सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु होणार , जाणुन घ्या आत्ताची मोठी अपडेट !

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांना आता नवा वेतन आयोगाची चाहुल लागली आहे .सध्या सातव्या वेतन आयोगाप्रमाणे अधिकत्तम वेतन व डी.ए वाढ झाली असल्याने , कर्मचाऱ्यांच्या वेतनप्रणालींमध्ये सुधारणा करणे गरजेचे असल्याची बाब तज्ञांनी स्पष्ट केले आहे .शिवाय महागाई भत्तावाढीच्या दरानुसार नवा वेतन आयोग लवकरच लागु करण्यात येतील .

महागाई भत्ता 50 टक्केपेक्षा अधिक झाल्यास , नवा वेतन आयोगाची शिफारस –

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 50 टक्केपेक्षा अधिक वाढ झाल्यास , कर्मचाऱ्यांना स्वयंचलित वेतनवाढ प्रणालीप्रमाणे / नवा वेतन आयोग लागु करुन वेतन वाढ लागु करण्याची शिफारस सरकारच्या विचाराधीन आहे .केंद्रीय युनियनकडुन नवा वेतन आयोग लागु करणेबाबत , निवेदने दिले असुन लवकरात लवकरच नवा वेतन आयोग लागु करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडुन करण्यात येत आहे .

AIDFI : आखिल भारतीय संरक्षण कर्मचारी फेडरेशनने स्पष्ट केले आहे कि , सरकारने जर कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग / आठवा वेतन आयोग आणि जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित केले नाही तर कर्मचारी संपावर जाऊ शकतात .

नवा वेतन आयोग / स्वयंचलित वेतन प्रणाली –

सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्यात येईल अथवा तज्ञांच्या मतानुसार , स्वयंचलित वेतन प्रणाली लागु करण्यात येईल . स्वयंचलित वेतन प्रणालीमध्ये , कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये अधिकत्तम म्हणजेच 50 टक्केपेक्षा अधिक वाढ झाल्यास , स्वयंचलित वेतन प्रणालीद्वारे वेतनामध्ये वाढ करण्यात येईल .नवा वेतन आयोगाला हा एक पर्याय असल्याचे तज्ञांने स्पष्ट केले आहे .

कर्मचारी  विषयक , भरती / योजना व महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment