7 th Pay Commission : सन 2023 नविन वर्षामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये होणार 50 हजार ते 1 लाखपर्यंत वाढ ! जाणुन घ्या आत्ताची मोठी अपडेट !

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या नविन वर्षांमध्ये मोठी भेट मिळणार आहे .ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये 50 हजार ते 1 लाख रुपये पर्यंतची मोठी वाढ होण्याची शक्यता आहे .येत्या नविन वर्षांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता त्याचबरोबर नवा वेतन आयोग लागु करण्याच्या तयारी सरकार कडुन दिसुन येत आहेत .

सन 2016 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सहावा वेतन आयोग लागु करण्यात आला होता .दर आठ – दहा वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगामध्ये बदल करण्यात येतो . यामुळे कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागु करणेबाबत , मिडिया अहवालानुसार मोठी चर्चा देखिल केंद्रीय पातळीवर करण्यात येत आहेत . संसदेमध्ये देखिल नवा वेतन आयोग ( आठवा वेतन आयोग ) लागु करणेबाबत एका सदस्याकडुन प्रश्न उपस्थित करण्यात आले होते .

महागाई भत्ता मध्ये 3 टक्के ते 5 टक्के वाढ –

ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा विचार केला असता नविन वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये तब्बल 3 टक्के ते 5 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे .डी.ए मध्ये 3 ते 5 टक्के वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 5,000/- रुपये ते 25,000/- रुपये वाढ होईल .

फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 पट वाढ करण्याची मागणी –

नवा वेतन आयोग लागु करणेबाबत , कर्मचारी युनियनकडुन मोठा दबाव निर्माण केला जात आहे . नवा वेतन आयोग वेतन सुधारणा करताना फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 पट वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडुन होताना दिसत आहे . यामुळे कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे .यामुळे उच्च वेतनश्रेणीमध्ये वेतन धारण करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 50,000 ते 1 लाख रुपये पर्यंत वाढ होईल .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment