GR : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.16.12.2022

Spread the love

राज्य शासन सेवेतील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमुल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पुर्ण करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.16.12.2022 रोजी निर्गमित झाला आहे .या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा दि.16.12.2022 राजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच सन 2021-22 या वर्षाचे कार्यमुल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपुर्ण कार्यवाही दिनांक 31.12.2022 पर्यंत पुर्ण करणेबाबत सुचना देण्यात आल्या आहेत .महापारमध्ये कार्यमुल्यमापन अहवाल भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तसेच विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन या पार्श्वभुमीवर कार्यमुल्यमापन अहवाल लिहीण्याबाबतची संपुर्ण कार्यवाही पुर्ण करण्यासाठी दिनांक 15.01.2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे .सदरची मुदतवाढ ही अंतिम असणार आहे .

महापारमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सन 2021-22 या वर्षाचे गोपनिय अहवाल दिनांक – 16.01.2023 रोजी महापार प्रणालीत बंद करण्यात येतील . महापारमध्ये समाविष्ट नसलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत सन 2021-22 वर्षाचे कार्यमुल्यमापन अहवाल दि.15.01.2023 पर्यंत अंतिम करण्यात येणार आहे .

वर नमुद केलेल्या वेळेत ही सर्व कार्यवाही केली जाईल याची जबाबदारी संबंधित आस्थापना अधिकारी / संस्करण अधिकारी यांची असणार आहे .या संदर्भातील सा.प्र.विभागाचा द‍ि.16.12.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलाड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment