तुम्ही जर भविष्यात कार घ्यायचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी नवीन संधी उपलब्ध झाली आहे. जर तुम्हाला नवीन कार घ्यायची असले तर 10 लाख रुपयांच्या बजेट मध्ये कार खरेदी करण्याची ऑफर चालू आहे. तर आपण या कार बद्दलच्या ऑफर जाणून घेऊया. या 10 लाख रुपयांच्या भारतीय कार आपल्याला खूप उपयोगी ठरू शकते.
10 लाख रुपयापर्यंतच्या या कार मध्ये हँचबँक, सेडान आणि सबकाँम्पँक्ट एसयुव्हीआय अनेक चांगले पर्याय मिळतील. आजच्या या संधीमध्ये आपण 10 लाखाच्या बजेट मध्ये येणार्या टॉप 5 कार बाबत माहीत जाणून घेऊया. Tata punch ही SUV स्टँन्स असलेली हँचबँक कार आहे. जर आपण चांगली जागा आणि हाय ग्राउंड क्लीअरन्स असलेली कार शोधत असेल तर हा एक चांगला मार्ग आहे. यामध्ये फक्त 1.2 लिटर पेट्रोल इंजीन मिळेल. मात्र या कार मध्ये जबरदस्त ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आणि 5- स्पीड मँन्युअल गिअरबॉक्स आणि AMT unit मिळेल.
सध्या कारची एक्स शोरूम किंमत 5.93 लाख ते 9.49 लाख रुपये इतकी आहे. जर आपण सबकॉम्पॅक्ट सेडान घ्यायचा विचार करीत असाल तर Honda-Amez हा एक चांगला पर्याय आहे. या कार मध्ये 1.2 लिटर पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इतके इंजीन मिळेल. या दोन्ही मध्ये 5 स्पीड मँन्युअल आणि दुसरा पर्याय म्हणजे CVT ऑटोमॅटीक ट्रान्समिशन मिळते. सध्या या कार ही एक्स शोरूम किंमत 6.63 लाख रुपये ते 11.50 लाख रुपये आहे. जर आपण पंच पेक्षा थोडी मोठी गाडी घ्यायचा विचार करीत असाल तर Nissan Magnite हा एक चांगला पर्याय आहे.
आता, Magnite ही पेट्रोल- ओन्ली सबकॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे. यामध्ये मात्र 1.0 लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड इंजिन किंवा 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजीनचा पर्याय मिळू शकते. या दोन्ही मध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतील. या कारची किंमत 5,97,000/-लाख ते 10,54,000/- लाख रुपये या रेंज मध्ये आहे. जर आपण Magnite पेक्षा चांगली दिसणारी कार शोधत असेल तर kia sonet अतिशय चांगली कार आहे. या सबकॉम्पॅक्ट एसयुव्ही मध्ये जबरदस्त फिट आणि फिनिशिंग सहित चांगले फिचर्स देखील मिळते. त्याचबरोबर यामध्ये पेट्रोल (petrol ) तसेच डिझेल इंजिन मध्ये देखील पर्याय आहेत .
या कार मध्ये नॅच्युरली एस्पिरेटेड 1.2 लिटर पेट्रोल इंजीन, 1.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल मोटर देण्यात आली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 7.47 लाख ते 13.99 लाख रुपये आहे. आपण Hyundai i20 ही कार खरेदी करण्याचा विचार सुद्धा करू शकता.या कार मध्ये उत्तम फिट आणि फिनिशिंग,मॉडर्न कम्फर्ट आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञानासह स्मार्ट टेक फीचर्स मिळतील. या कार मध्ये डिझेल इंजिनसह नॅच्युरली एस्पिरेटेड 1.2 लिटर पेट्रोल आणि 1.0 लिटर टर्बो इंजीनचा पर्याय मिळतो. सध्या या कारची एक्स शोरूम किंमत 7.07 लाख ते 11.63 लाख रुपये आहे. अशाप्रकारे तुम्ही 10 लाख रुपयांच्या बजेट मध्ये कार खरेदी करू शकता.
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !