शेतकऱ्यांनो मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शासन देत आहे 90% शासकीय अनुदान ! अर्जाची शेवटची तारीख ही असून आजच अर्ज करून घ्या !

Spread the love

mini tractor subsidy सध्याच्या बदलत्या काळानुसार यांत्रिकीकरण हा एक कृषी क्षेत्रांमधील सर्वाधिक महत्त्वाचा भाग झाला असून यांत्रिकीकरणाचे महत्व हे शेतीसाठी दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. यांत्रिकीकरणाचा वापर शेतीमध्ये झाल्यामुळे शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचत असून कमी वेळेत जास्त आणि मनाला पाहिजेल असे काम पूर्ण करण्याची ताकद या यांत्रिकीकरणांमध्ये आहे. कृषी क्षेत्रामध्ये ट्रॅक्टर हे प्रामुख्याने महत्त्वपूर्ण यंत्र मानले जात आहे. त्यामध्ये मिनी ट्रॅक्टर मोठे ट्रॅक्टर व मिडीयम ट्रॅक्टर अशा प्रकारांमध्ये ट्रॅक्टर हे विविध पिकांच्या मशागतीनुसार शेतीसाठी वापरले जात आहेत.

प्रामुख्याने फळबागांमध्ये मशागतीसाठी मिनी ट्रॅक्टरचा वापर केला जात असून हा ट्रॅक्टर वापरण्यासही अगदी सोयीस्कर आहे. मित्रांनो तुमची देखील इच्छा असेल की आपल्या पिकांच्या मशागतीसाठी आपला स्वतःचा मिनी ट्रॅक्टर असायला हवा तर आम्ही आमच्या लेकाच्या माध्यमातून तुमच्यासाठी मिनी ट्रॅक्टर बाबत एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.

मिनी ट्रॅक्टरवर मिळणार 90% अनुदान…

सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्याकरिता शासनाने ही योजना राबवली असून या योजनेच्या माध्यमातून नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांना व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना यासोबतच या प्रवर्गातील बचत गटातील सभासदांना नव्वद टक्के अनुदानावर शासन मिनी ट्रॅक्टर उपलब्ध करून देणार आहे. यासोबतच ट्रॅक्टर सोबत लागणारी उपकरणे यांची खरेदी करण्यासाठी देखील शासनातर्फे अनुदान मिळत आहे.

मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी शेवटची तारीख ही 23 डिसेंबर असणारा असून या तारखेपर्यंत इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावयाचा आहे.

शासनाने राबवलेल्या या योजनेच्या माध्यमातून 90 टक्के अनुदानावर अनुसूचित जाती जमातीमधील शेतकऱ्यांना व नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे. यासाठी शासनातर्फे जास्तीत जास्त मर्यादा ही सव्वातीन लाख रुपये केली असून अनुदानाचा लाभ घेण्याकरिता संमेल सहाय्यता बचत गटांनी घाटके रक्कम स्वतः भरायचे आहे आणि यामध्ये मात्र 90 टक्के रक्कम शासनातर्फे तुम्हाला दिली जाईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी देखील अर्ज करावेत असे आवाहन केले जात आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता…

1- योजनेचा लाभ घेण्याकरिता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्रातील रहिवासी असावेत.

2 – यासोबत शेतकरी मित्रांनो योजनेचा लाभ घेण्याकरिता पैशाचे गटातील 79 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असावेत.

3- अर्जदारास जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असणार आहे.

4- ज्या व्यक्तींनी या योजनेचा लाभ ह्याआधी घेतलेला असेल त्या व्यक्ती या योजनेस पात्र ठरणार नाहीत.

अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील व नवबौद्ध घटकातील सर्वस्वयम सहाय्यता बचत गट यांच्या विहित नमुन्यातील केलेल्या अर्जासाठी सहाय्यक आयुक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण कार्यालय सामाजिक न्याय भवन सोलापूर या ठिकाणी संपर्क करावा.

Leave a Comment