आता जुनी पेन्शन लागु करावीच लागणार ! जुनी पेन्शनसाठी राज्य कर्मचाऱ्यांचे भव्य पेन्शन संकल्प यात्रा !

Spread the love

जुन्या पेन्शनच्या नावाने केंद्र सरकार आणि अन्य राज्य सरकार नविन पाऊले उचलत असतांना महाराष्ट्रातील राज्य सरकार डोळे असूनही आंधळेपणाचे नाट्य करीत आहे .त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचा शासनावरील विश्वास उडत चालला आहे . महाराष्ट्राशेजारील पश्चिम बंगाल , राजस्थान , छत्तीसगढ ,झारखंड , पंजाब , आणि हिमाचल प्रदेश राज्य सरकार जुनी पेन्शन योजना लागू करुन तेथील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन त्यांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेत आहे .

मात्र महाराष्ट्रातील राज्य सरकार झोपेचे सोंग घेवून टाळाटाळ करीत आहे . त्यामुळे महात्मा गांधी यांचा आदर्श् ठेवत करेंगे या मरेंगे चा नारा देत पायी चालत गांधीभूमी सेवाग्राम , वर्धा ते नागपुर विधीमंडळावर हजारो कर्मचारी पेन्शन संकल्प यात्रा काढणार आहे .आणि ही संकल्प यात्रा येत्या राज्य निवडणुकीत जो देईल पेन्शन , त्यालाच देवू समर्थन या माध्यमातुन सर्व कर्मचाऱ्यांची एकजून दिसणार आहे .

महाराष्ट्र शासनाने दि.01.11.2005 रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना दि.31.10.2005 च्या वित्त विभाग अध्यादेशानुसार जुनी पेन्शन योजना रद्द करुन राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आली . या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांने दिलेले योगदान हे शेअर बाजारांमध्ये गुंतवणुक केली जाते . यामुळे परतावा बाबत अधिक जोखिम असल्याने , ही योजना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी लाभदायक ठरत नाही .

राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन , जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी , याकरीता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत दि.25.12.2022 ते 26 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये सेवाग्राम ते नागपुर बाईक रॅली व बुट्टीबोरी ते खापरी पदयात्रा नागपुर विधिमंडळावर काढण्यात येणार आहे .संघटनेकडुन भव्य पेन्शन संकल्प यात्रा बाबत निर्गमित झालेले प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेट मिळविण्यासाठी Whatsapp ग्रुपमध्ये जॉइन व्हा .

Leave a Comment