वयाच्या 50/55 व्या वर्षापलिकडे / अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन करुन मुदतपुर्व सेवानिवृत्त करण्याबाबत एकत्रिक कार्यपद्धती करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडुन दि.10.06.2019 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .या संदर्भातील सुधारित शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार , वयाच्या 50/55 व्या वर्षी / 30 वर्षे अर्हताकारी सेवा झालेल्यापैकी अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना लोकहिताच्या दृष्टीने मुदतपुर्व सेवानिवृत्ती करावे असे शासनाचे धोरण आहे .राज्य शासन सेवेमध्ये 35 व्या वर्षापुर्वी आलेल्या वर्ग – अ व वर्ग ब च्या राजपत्रित अधिकाऱ्यांचे त्यांच्या वयाची 50 वर्षे पुर्ण होतेवेळी अथवा अर्हताकारी सेवेची 30 वर्षे पुर्ण होते वेळी यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी एकदाच पुनर्विलोकन करण्यात येईल .
वर्ग क व वर्ग ड कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या वयाच्या 55 व्या वर्षी किंवा त्यांच्या अर्हताकारी सेवेची 30 वर्षे पुर्ण होतेवेळी यापैकी जे अगोदर घडेल तेव्हा पुनर्विलोकन करण्यात येईल .
शासन सेवा पुढे सुरु ठेवण्याकरीता पात्रापात्रता आजमाविण्यासाठी शारीरिक क्षमता / प्रकृतिमान , निर्विवाद सचोटी व चांगल्यापेक्षा कमी नाही असा गोपनिय अभिलेख असणे आवश्यक आहे . तसेच शारीरिक क्षमता / प्रकृतिमान , निर्विवाद सचोटी व प्रतिकृल नसतील असे वैयक्ति नस्तीमधील अभिप्राय असणे आवश्यक आहे .या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागांकडुन निर्गमित झालेला सुधारित शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !