या दोन बँका देत आहेत FD वर 9.25% व्याजदर ! गुंतवणूकीची मोठी संधी !

Spread the love

काही बॅंका ह्या लहान मोठ्या योजना तयार करीत असतात. त्यामध्ये 2 बॅंका अशा आहे की त्या मुदत ठेवीवर 9 टक्के व्याज देत आहे तर त्या बँके बद्दल जाणून घेऊया. या 2 बॅंका 9 टक्के व्याज देत आहे त्याचा जास्त फायदा जेष्ठ नागरिकांना होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काही बँकांनी मुदत ठेवीवर व्याजदर वाढविले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील खाजगी आणि सरकारी बँकांनी त्याच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मुदत ठेव ही सर्वात लहान आणि सुरक्षित गुंतवणूक आहे. गुंतवणुकीसाठी अनेक मार्ग उपलब्ध असतानाही अनेकजण मुदत ठेवीसाठी मदत करीत आहे.बॅंका जेष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर जास्त व्याज देतात. 2 बँकेकडून मुदत ठेवीवर 9 टक्के व्याज दिले जात आहे. सध्याच्या परिस्थितीत खूप लोकांना बँकेकडून मुदत ठेवीवर 4 ते 7 टक्के व्याजदर दिले आहे.सूर्योदय स्माँल फायनान्स बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदरात 50 बेसिस अंकांनी वाढ केली होती. बँकेचे नवीन व्याजदर 6 डिसेंबर पासून लागु करण्यात आले आहे. या बँकेच्या मुदत ठेवीवर जेष्ठ नागरिकांना चांगला व्याजदर मिळत आहे.

सूर्योदय स्माँल फायनान्स बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवीवर जेष्ठ नागरिकांना 9.26 टक्के दराने व्याज दिले आहे. बँकेने 15 दिवसाच्या मुदतीसह 5 वर्षाच्या मुदत ठेवीची ऑफर चालू केली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास सर्व सामान्य लोकांना 9.1 टक्के दराने व्याज मिळेल. त्याच वेळी जेष्ठ नागरिकांना 9.26 टक्के दराने व्याज मिळणार आहे. दुसरी बँक म्हणजे युनिटी स्माँल फायनान्स बँक होय. या बँकेने सुध्दा मुदत ठेवीवरील व्याज दरात वाढ केली आहे. बँकेकडून मुदत ठेवीवर जेष्ठ नागरिकांना 4.5 टक्के ते 9 टक्के व्याजदर देत आहे.

सध्या बँकेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, सध्या जेष्ठ नागरिकांना 181 आणि 501 दिवसाच्या मुदत ठेवीवर 9 टक्के व्याज देत आहे. जेष्ठ नागरिकां व्यतिरिक्त इतर लोकांना 181 दिवसासाठी मुदत ठेवीवर 8.50 टक्के व्याज दराने व्याज देण्याची घोषणा बँकेने केली आहे. युनिटी स्माँल बँक ही एक शेड्युल कमर्शियल बँक आहे.सेंट्रम फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड हे एक संयुक्त गुंतवणूकदार म्हणून रेसीलियंट इनोव्हेशन्स प्राइव्हेट लिमिटेडसह प्रमोटर आहे. रिझर्व्ह बॅंकेने या महिन्यात रेपो दरात 0.35 टक्क्याने वाढ केली आहे. अशाप्रकारे तुम्ही छोट्या मोठ्या बँकेतून कमी व्याजाने कर्ज काढून आपली कामे पूर्ण करू शकता.

Leave a Comment