Business Idea : गुंतवणूक करा फक्त 2 लाखांची व कमवा दरमहा 10 लाख रुपये !

Spread the love

आपल्याला चांगला व्यवसाय चालू करण्याची संधी मिळाली आहे. या व्यवसायात जास्त पैशाची गुंतवणूक करण्याची गरज नाही. या व्यवसायात 2 लाख रुपयाची गुंतवणूक केल्यास त्यावर 10 लाख रुपये महिना कमाऊ शकता. तर त्या व्यवसायाबद्दल परिपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊया.अनेकांना वाटते की आपला एक स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय असावा.

परंतु खूप लोकांजवळ व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल आणि व्यवसाय चालू करण्यासाठी पैसे नसते त्यासाठी लोक खूप विचार करीत असतात. तर तुम्ही व्यवसाय चालू करायचा विचार करत असाल आणि तुम्ही छोट्या गुंतवणुकीतून दर महिन्याला मोठी रक्कम कमवायचा विचार असेल, तर एक चांगली संधी तुमच्याकडे आहे. कोरोना या रोगामुळे अनेक उद्योग, कंपनी, व्यवसाय बंद पडले. परंतु या काळात जे क्षेत्र चालू होते ते म्हणजे डेअरी आणि डेअरी प्रॉडक्ट. या कोरोनाच्या काळात दूध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर चालू होता.

डेअरी क्षेत्रातील एक मोठे आणि चांगल्या प्रकारे चालणारे नाव म्हणजे अमूल आहे. आम्ही तुमच्यासाठी एक अशी संधी घेऊन आलो ज्या मध्ये गुंतवणूक कमी आणि नफा मोठ्या प्रमाणात होणार आहे. तुम्हाला अमूल या प्रसिद्ध डेअरी उत्पादन कंपनी सोबत व्यवसाय करण्याची उत्तम संधी आहे. अमूल फ्रेंचायजी तुम्हाला दर महिन्याला मोठा नफा देऊ शकते. अमूलची फ्रेंचायजी घेणे खूप सोपे आहे. आणि त्यामध्ये व्यवसाय करणे खूप सोपे आहे. खरे तर यामध्ये 2 कारणे आहे. ते म्हणजे अमूल कंपनी मध्ये ग्राहकांची खूप गर्दी असते आणि दुसरा म्हणजे शहरातील कोणत्याही ठिकाणी अमूलची दुकान लावू शकतो.

अमूल या कंपनीचे कोणत्याही शहरात चांगली कमाई आहे. प्रत्येक शहरातील लोक त्याची उत्पादने नावाने ओळखतात. मोठ्या शहरांसोबतच छोट्या शहरात सुद्धा अमूलचे प्रॉडक्ट उपलब्ध झाले आहेत. म्हणूनच अमूलची फ्रेंचायझी घेतल्यास कोणताही तोटा होत नाही. अमूल आपला व्यवसाय वाढविण्यासाठी 2 प्रकारचे फ्रेंचायझी वापरतात.तुम्हाला अमूल आउटलेट,अमूल पार्लर किंवा अमूल कियोस्कोची फ्रेंचायझी घ्यायची असले तर त्यात तुम्हाला 2 लाख रूपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये नॉन-रिफंडेबल ब्रँड सेक्युरीटी म्हणून 25 हजार रुपये,नूतनीकरणासाठी 1 लाख रुपये आणि भांडवलासाठी 75 हजार रुपये खर्च केले जातात. तुम्हाला अमूल आईसक्रीम स्कुपिंग पार्लर चालवायचे असेल आणि त्याच्या फ्रेंचायझीची योजना बनवायची असेल तर तुम्हाला यामध्ये जास्त गुंतवणूक करावी लागेल. ते मिळविण्यासाठी तुम्हाला 5 लाख रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये तुम्हाला ब्रँड सेक्युरीटी म्हणून 50 हजार रुपये, नूतनीकरणासाठी 4 लाख रुपये आणि भांडवलासाठी 1.50 लाख रुपये खर्च करावे लागतील. तुम्हाला अमूल आउटलेटची फ्रेंचायझी घ्यायची असले तर तुमच्याकडे 150 स्क्वेअर फूट जागा असायला पाहीजे.तुमच्याकडे पुरेशी जागा असल्यास अमूल तुम्हाला फ्रेंचायझी देईल.

परंतु अमूल आईसक्रीम पार्लरच्या फ्रेंचायझीसाठी 300 स्क्वेअर फूट जागा असायला हवी.तुमच्याकडे इतकी जागा नसेल तर अमूल तुम्हाला फ्रेंचायझी देणार नाही. अमूल फ्रेंचायझीने दिलेल्या माहितीनुसार, या माध्यमातून दर महिन्याला 5 ते 10 लाख रुपयांचा नफा मिळू शकतो. अमूल आउटलेट घेतल्यावर कंपनी अमूल उत्पादनाच्या विक्री किंमतीवर कमिशन देते.अमूल या मध्ये दुधाच्या पॉकेट वर 2.5 टक्के, दुग्धजन्य पदार्थावर 10 टक्के आणि आईसक्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते. अमूल आईसक्रीम स्कुपिंग पार्लरची फ्रेंचायझी घेतल्यावर तुम्हाला रेसीपीवर आधारित आईसक्रीम शेख,पिझ्झा, सँडविच, हाॅट चाॅकलेट ड्रिंकवर 50 टक्के कमिशन मिळते. अमूल कंपनी प्री-पॅक केलेल्या आईसक्रीमवर 20 टक्के कमिशन अमूल उत्पादनावर 10 टक्के कमिशन देते.

अमूल कंपनी कडून तुम्हाला ओळख करून दिली जाईल. सर्व साहित्य आणि ब्रँडींवर सबसिडी दिली जाईल. त्यासाठी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरपूर मदत केली जाईल. जास्त माल खरेदी केल्यास डिस्काउंट दिली जाईल. ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर दिल्या जाईल.याशिवाय मालक किंवा कंपनीला ट्रेनिंग दिले जातील. माल तुमच्या पर्यंत पोहोचण्याची जबाबदारी अमूल कंपनीची राहील. अमूल कडून प्रत्येक मोठ्या शहरात, जिल्ह्याच्या ठिकाणावर होलसेल डीलर नियुक्त केले आहेत. हे डीलर तुमच्या पर्यंत माल पोहोचण्याची कामे करतात.

सर्व तपशील डिटेल्स मध्ये माहिती करून घेण्यासाठी अमूलच्या वेबसाईटला भेट द्यावी,असे सांगितले जाते. अशाप्रकारे तुम्ही अमूल कंपनीच्या माध्यमातून दर महिन्याला 10 लाख रुपयांचा व्यवसाय चालू करू शकता.

Leave a Comment