जुनी पेन्शन योजना लागु करणेसंदर्भात लोकसभेमध्ये लोकसभा सदस्य श्री.असादुद्दीन औवेसी यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता .या प्रश्नावर केंद्रीय वित्त राज्य मंत्री डॉ.भागवत कराड यांनी सदर अतारांकित प्रश्नाला प्रतिउत्तर दिले आहेत .
राजस्थान ,छत्तीसगढ तसेच झारखंड राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) प्रणाली लागु केली आहे .या निर्णयासंदर्भात केंद्र सरकार / विधी विनियामक आणि विकास प्राधिकरण विभागांना सुचित करण्यात आले आहे .तसेच पंजाब राज्य सरकारने दि.18.11.2022 रोजी आपल्या राज्य कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आली आहे .
सदर वरील नमुद राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागु केल्याने सदर राज्यातील कर्मचाऱ्यांचे एनपीएस मध्ये संचति कॉर्पस निधी परत करणे संदर्भात केंद्र सरकार / पीएफआरडीए ला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे .एनपीएस मध्ये जमा निधी सदर राज्य कर्मचाऱ्यांना टप्याटप्याने संबधित कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये व्याजासह जमा करण्यात येणार असल्याची माहीती केंद्रीय वित्त राज्य मंत्री यांनी दिलेली आहे .
तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत प्रश्न उपस्थित केला असता , जुनी पेन्शन योजना लागु करणेसंदर्भातील प्रस्ताव पीएफआरडीए विभागांना प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती वित्त राज्य मंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिली .या संदर्भातील लोकसभा अतारांकित प्रश्न संदर्भात माहीती पुढीलप्रमाणे पाहु शकता .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp group मध्ये सामिल व्हा
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !