भगव्या रंगाच्या बिकनी वरून वातावरण अधिकच पेटले ! दीपिका होतेय ट्रोल !

Spread the love

बेशरम रंग या गाण्यात सुरू असलेल्या या वादावर यशराज फिल्मकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेली नाही. भगव्या रंगाची बिकनी घालून दिपका पदुकोण हिने फिल्म काढली आहे.तिचे कपडे हे अंगभर नसल्यामुळे तिला तुकडे तुकडे गँग असे म्हटले आहे. “पठाण “या फिल्मचे “बेशरम रंग” हे गाणे खूप फेमस झाले आहे. या गाण्यात तिने भगव्या रंगाची बिकनी घातल्यामुळे त्यासाठी खूप वाद चालू आहे.

सोशल मीडिया वर या फिल्मला नकार दिला जात आहे. काही भाजपच्या नेत्यांनी यावर संतप्त विरोध केला होता. त्यानंतर आता अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही सोशल मीडियावर होत असलेल्या या विरोधाला पाठींबा देत दीपिका पदुकोणवर टीका केली आहे. शर्लिनने मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या भाषणाला समर्थन दिले आहे. “पठाण ” या वादावर बोलताना शर्लिन चोप्रा म्हणाली दीपिका पदुकोणला तुकडे तुकडे गँग बद्दल सहानुभूती वाटते. अशात जेव्हा पठाण चित्रपटातील गाण्यात ती भगव्या रंगाची बिकनी घालते तेव्हा तिला कोट्यावधी हिंदू स्विकारत नाही. हा रंग शुद्धता, प्रामाणिकपणा आणि समर्पणाचे प्रतीक आहे. मी नरोत्तम मिश्रा यांच्या वक्तव्याशी पूर्णपणे सहमत आहे.

याशिवाय तिने आमीर खानने केलेली कलश पूजा आणि शाहरुख खानने घेतलेले वैष्णोदेवीचे दर्शन यावरही प्रतिक्रिया केली आहे. ज्यांच्या त्या देवावर विश्वास आहे त्याचे ते दर्शन करू शकते. परंतु सामन्य लोकांचे मन न दुखले पाहिजे अशी त्यांनी काळजी घेतली पाहिजे.”बेशरम रंग “या गाण्यावरून सुरू असलेल्या या वादावर यशराज फिल्म कडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेली नाही.

“पठाण “हा एक अँक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले. या चित्रपटात शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांची सुद्धा भूमिका आहे. येत्या 25 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment