वित्त विभाग : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत वित्त विभागांकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.19.12.2022

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील वित्त विभागाच्या अधिपत्याखालील वस्तू व सेवा कर कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्यांच्या अधिकारांचे प्रत्यायोजन करणेबाबत , वित्त विभागांकडुन अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.19 डिसेंबर 2022 रोजी निर्गमित झालेला आहे . या वित्त विभागाकडुन दि.19.12.2022 रोजी निर्गमित झालेला सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या विनियमन करण्यासाठी आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध करण्यासाठी बदली अधिनियम , 2005 मधील कलम 6 मधील दुसरे परंतुक व कलम 7 नुसार वित्त विभागाच्या अधिपत्याखालील वस्तू व सेवा कर कार्यालयातील बदल्यांच्या अधिकारांबाबत अधिक्रमित करुन सदर अधिकार पुढीलप्रमाणे मा.मंत्री / अधिकाऱ्यांना प्रर्दान करण्यात येत आहेत .

यामध्ये अपर आयुक्त वर्ग – अ अधिकाऱ्यांच्या बदली करण्यास 2005 च्या अधिनियमातील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारी मुख्यमंत्री होते , यामध्ये बदल करुन बदली करण्यास सक्षम प्राधिकारी मंत्री संबंधित विभाग असा बदल करण्यात आला आहे .तसेच वर्ग – ब अधिकाऱ्यांच्या बदलीकरतीा सक्षम प्राधिकारी 2005 च्या अधिनियमानुसार सक्षम प्राधिकारी मंत्री ( संबंधित विभाग ) होते यामध्ये बदल करुन बदली करण्यास सक्षम अधिकारी संबंधित विभाग आयुक्त करण्यात आले आहे .

तसेच वर्ग – क संवर्गातील सर्व कर्मचारी यांच्या क्षेत्रांतर्गत बदली करण्यास सक्षम प्राधिकारी संबंधित विभाग आयुक्त असा बदल करण्यात आला आहे . तर वर्ग ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदली करीता देखिल संबंधि क्षेत्रीय अपर आयुक्त सक्षम प्राधिकारी असणार आहेत .या संदर्भातील‍ वित्त विभागांकडुन दि.19.12.2022 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment