GR : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना सेवानिवृत्ती नंतर सेवेत कामासाठी घेणेबाबत सुधारित शासन निर्णय !

Spread the love

राज्य शासन सेवेतुन नियत वयोमानानुसार , सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेणेबाबत सामान्य प्रशासन विभागांडुन दि.08 जानेवारी 2016 रोजी एक महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . या संदर्भाती सा.प्र.विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांची केवळ विवक्षित कामाकरीताचा कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येईल .परंतु या करार पद्धतीच्या नियुक्तीमुळे शासन सेवेत असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या पदोन्नतीच्या संधीवर प्रतिकुल परिणाम होणार नाही याची दक्षता संबंधित कार्यालयांना आदेशित करण्यात आले आहेत .विवक्षित कामाचे स्वरुप लक्ष्यात घेवून प्रथम नियुक्ती देताना एक वर्षांची असणार आहे .असे तीन वर्ष नुतनिकरण करता येईल . परंतु एकास तीन वर्षांपेक्षा अधिक काळ नियुक्ती देता येणार नाही .

विवक्षित कामाचे स्वरुप : विवक्षित कामाच्या स्वरुपमध्ये आस्थापनाविषयक बाबी / सेवाप्रवेश नियम कामकाज , पायाभुत सुविधा निर्मिती , नागरी सेवा पुरविणे , विशषे गुप्त वार्ता , योजनांचे मुल्यमान अशा कामांचा समावेश विवक्षित कामांमध्ये होतो .

करार पद्धतीने नियुक्त करताना कर्मचाऱ्याची कमाल वयोमर्यादा ही 70 वर्षांपेक्षा अधिक नसावी अशी अट नमुद करण्यात आली आहे . तसेच करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी हा शारिरीक दृष्ट्या तसेच मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे .या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा दि.08.01.2016 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment