IPC : शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यात येणारे ,  महत्वपुर्ण कायदे ! कर्मचाऱ्यांना हे कायदे माहिती असणे आवश्यक !

Spread the love

शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतुने भारतीय दंड संहिता मध्ये काही नियम / कायदे तयार करण्यात आलेले आहेत . या कायद्यांनुसार कर्मचाऱ्यांना अधिक सुरक्षा प्रदान होते . इंडियन पिनल कोड मध्ये सदर नियम लागु करण्यात आलेले आहेत . शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा विषयक सविस्तर कायदे पुढीलप्रमाणे पाहुयात .

IPC -353 : शासकीय कामकाजामध्ये जर कोणी व्यतेय आणत असेल तर अशा विरुद्ध भारतीय दंड संहिता -352 नुसार कार्यवाही होते . सदर गुन्हेगारास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा नमुद आहे .यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना कामकाज करत असताना काम करताना सुरक्षा प्रदान होते .

त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांशी वाद घालणे अथवा अपशब्द वापरणे हे देखिल IPC – 502 नुसार गुन्हेस पात्र आहे . वाद घालणाऱ्या गुन्हेगारास 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सदर कायद्यानुसार नमुद आहे . त्याचबरोबर हल्ली शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी देण्याचे अनेक प्रकार घडत आहे , परंतु धमकी देणे हा एक मोठा गुन्हा आहे . शासकीय कर्मचाऱ्यास एखाद्याने धमकी दिल्यास सदर धमकी देणारा व्यक्ती हा IPC -506 नुसार 3 ते 7 वर्षे सश्रम कारावासास पात्र राहतो .

त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यास , भारतीय दंड संहिता 232,333 नुसार 3 वर्षे ते 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तर सहा महिने जामिन मिळत नाही .त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यास खंडणी मागणे / ब्लॅकमेल करणे , हे भारतीय दंड संहिता 383,3843386 नुसार गुन्हेगारास दोन ते दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा होते .

तसेच शासकीय कार्यालयात जोरजबरदस्तीने प्रवेश करणे IPC – 427 नुसार गुन्हेगारास 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा होते .तर शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे हे भारतीय दंड संहिता 378 , 379 नुसार सश्रम कारावासाची शिक्षा होते .त्याचबरोबर शासकिय मालमत्तेचे / दस्ताऐवजाची चोरी केल्यास 3 वर्षे तर मालमत्तेचे नुकसान केल्यास 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा होते .

शासकीय कामकाजात अर्वोच्च / गोंधळ करुन अडथळा निर्माण केल्यास भारतीय दंड संहिता 146,148,150 नुसार 6 महिने ते 2 वर्षापर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा होते .त्याचबरोबर शासकीय कार्यालयावर अथवा आवारात अनधिकृतरित्या नुकसानासाठी हिंसक जमाव गोळा केल्यास 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा होते .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment