Special Casual Leave : राज्य कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजेसंदर्भात काही सुधारित नविन नियम !

Spread the love

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजेमध्ये काही सुधारित नियमावली लागु करण्यात आलेल्या आहेत . कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिकेसाठी रजा मंजुर करण्यात येते .यामध्ये वेळोवेळी आवश्यक बदल देखिल लागु करण्यात येतो . कर्मचाऱ्यांना रजेसंदर्भातील सर्व नियम नागरी सेवा नियम 1981 नुसार नियमावली लागु असतात .

पिसाळलेला कुत्रा अथवा तत्सम जनावरांने चावा घेतला असल्यास , कर्मचाऱ्यांस उपचार घेण्याकरीता 21 दिवसांची विशेष नैमित्तिक रजा मिळते . पुरुष कर्मचाऱ्यांस स्वत : नसबंदी शस्त्रक्रिया करण्याकरीता 6 दिवस दिवस तसेच पहिल्या वेळी केलेली शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यास दुसऱ्यांदा नसबंदी करण्याकरीता आणखीण 6 दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळते .

कर्मचाऱ्याच्या पत्नीने बाळंतपणानंतर लगेचच संतती नियमनाची शस्त्रक्रिया केल्यास सदर पुरुष कर्मचाऱ्यास पत्नीची देखभाल करण्याकरीता 4 दिवस विशेष नैमित्तिक रजा अनुज्ञेय होते . तर बाळंतपणाव्यतिरिक्त अन्य वेळी संतती नियमनाची शस्त्रक्रिया केल्यास सदर पुरुष कर्मचाऱ्यांच्या 7 दिवसांची विशेष नैमित्तिक रजा मिळते .

कर्मचाऱ्यांने स्वच्छेने विनामुल्य रक्तदान केल्यास , सदर कर्मचाऱ्यास 1 दिवसांची Special Casual Leave मिळते .किरकोळ रजा ही दि.01 जानेवारी ते 31 डिसेंबर या कैलेंडर वर्षांमध्ये 8 दिवस घेता येते , किरकोळ रजा ही सार्वजनिक सुट्टी जोडून घेता येते .परंतु किरकोळ रजा ही अर्जित / अन्य प्रकारांच्या रजेला जोडुन घेता येत नाही .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉईन करा .

Leave a Comment