राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी ! सातव्या वेतन आयोगाचे तिनही हप्ते अदा करण्याकरीता वित्त विभागाकडुन निधींची तरतुद !

Spread the love

राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत राज्य विधीमंडळामधुन मोठी धक्कादायक बातमी समोर आली असतानाच , कर्मचारी हिताचे एक दिलासादायक वृत्त समोर येत आहे . ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे तिनही हप्ते अदा करण्याकरीता राज्य शासनांकडुन निधींची तरतुद करण्यात आलेली आहे .

राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग थकबाकीचे हप्ते अद्याप पर्यंत अदा करण्यात आलेले नाहीत . अशा महाराष्ट्रातील अनुदानित शाळामधील कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोागाचे तिनही हप्ते देण्याकरीता अतिरिक्त 2,135 कोटी रुपयांची तरतुद अधिवेशनांमध्ये मंजुर करण्यात आलेली आहे .

त्याचबरोबर राज्यातील सेवानिवृत्त पेन्शनधारक तसेच सेवानिवृत्तीचा लाभ अनुज्ञेय करण्याकरीता 2 हजार कोटींची पुरवणी मागणी अधिवेशनांमध्ये सादर करण्यात आलेली आहे .तसेच शासकीय , जिल्हा परिषदा व पेन्शनधारक यांना सेवानिवृत्तीचा लाभ देण्याकरीता 2 हजार कोटींची पुरवणी मागणी साद केल्याने , राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त होणार आहे .

यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगाचा पहिला , दुसरा  व तिसरा हप्ता बाकी आहे , अशा कर्मचाऱ्यांना थकित रक्कमांचे प्रदान करण्यात येणार आहे .

कर्मचारी विषयक , भरती / योजना व मराठी बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा

Leave a Comment