सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना 1982-84 ची जुनी पेन्शन योजना रद्द करुन नविन पेंशन योजना लागु केलेली आहे , परंतु या नविन पेन्शन योजनेंमध्ये सेवानिवृत्तीनंतर उदरनिर्वाह चालत नाही . यामुळे जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याकरीता कर्मचाऱ्यांकडुन आपल्या न्याय , अधिकारांसाठी एक दिवसीय भारत बंदची हाक दिली आहे .
जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता देशाभरातील सुमारे 36 लाख शासकीय कर्मचारी एकत्रित येणार आहेत .नॅशनल रेल्वे मजदूर यूनियनच्या वार्षिक अधिवेशन नागपुर येथे होणार आहे , यावेळी ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिवगोपाल मिश्रा यावेळी बालताना सांगत होते कि , 50 हजार रुपये वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्याला साधारण अडीच हजार रुपये पेंन्शन मिळते .तर जुनी पेन्शन प्रमाणे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांस 25,000/- रुपये निवृत्तीवेतन मिळायचे .
सध्या देशभरांमध्ये जुनी पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांकडुन आंदोलने करण्यात येत आहेत . काही राज्यांनी कर्मचाऱ्यांचे हित लक्ष्यात घेवून जूनी पेन्शन योजना लागु केली आहे .महाराष्ट्र राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागु केल्यास राज्य सरकार दिवाळखोरीत जाईल असे भाष्य अधिवेशनांमध्ये केल्याने , राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु होण्याची अशा मावळताना दिसत आहेत .
परंतु विविध संघटनांकडुन देशपातळीवर जुनी पेन्शनच्या मागणीकरीता विविध अधिवेशन घेवून , सरकारला कोंडीत काढण्यात येणार आहेत .जर सरकार याबाबत सकारात्मक भुमिका घेत नसल्यास , सरकारकडुन लवकरच भारत बंदची हाक देण्यात येणाार आहे .यामध्ये देशाभरातील सुमारे 36 लाख कर्मचारी सहभाग घेतील .
कर्मचारी विषयक , भरती / योजना व ताज्या बातमींच्या अपडेटसाठी Join करा Whatsapp ग्रुप
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !