कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार संवर्गाअंतर्गत दुसऱ्या प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायस्वरुपी बदली / समावेशन करणेबाबतचा सुधारित GR .

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार संवर्गातंर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवरुन , राज्य शासन सेवेतील दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशन / बदली करणेबाबत सामान्य प्रशासन विभागांकडुन दि.15.05.2019 रोजी एक महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

बदली अधिनियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांची बदली एका ठराविक परिघामध्येच होते , परंतु भविष्यात कर्मचाऱ्यांच्या काही अपवादात्मक वैयक्तिक अडचणी निर्माण होतात , अशा वेळी सदर कर्मचाऱ्यांना संवर्गाबाहेर दुसऱ्या प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवार समावेशन करुन घेणेबाबत , विविध अटी व शर्तींच्या अधिन राहुन बदली करण्यात येते .दुसऱ्या आस्थापनेवर कायमस्वरुपी पद्धतीने समावेशन करण्यासाठी काही धोरणे निश्चित करण्यात आलेले आहेत , यामध्ये राज्य शासन सेवेतील केवळ संवर्ग – क मधीलच कर्मचाऱ्यांना दुसऱ्या प्राधिकाऱ्याची ठिकाणी बदली करता येईल .

त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्यास पहिल्या नियुक्त पदावर किमान पाच वर्षे सलग सेवा पूर्ण झाली असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर कर्मचारी ज्या संवर्गामध्ये कार्यरत आहे , त्या संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये नमुद केलेल्या सर्व अर्हतांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे .त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्यांविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी / न्यायालयीन प्रकरणे सुरु अथवा प्रस्तावित नसावे .त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्याला स्थायित्व प्रमाणपत्र प्राप्त झाले असणे आवश्यक आहे .

समान पदनाम , समान वेतनश्रेणी , समान सेवाप्रवेश नियम तरतुदी आणि समान कर्तव्य व जबाबदाऱ्या असलेल्या पदावर कायमस्वरुपी समावेशन जसे कि , लिपिक – टंकलेखक पदावरुन लिपिक – टंकलेखक पदावर , लेखा लिपिक पदावरुन लेखा लिपिक पदावर , तलाठी पदावरुन तलाठी पदावर अशा पद्धतीने समावेशन करता येईल .

तसेच एकाच जिल्हामध्ये एका प्राधिकाऱ्याकडुन त्याच जिल्ह्यातील दुसरऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे कायमस्वरुपी समावेशन करता येणार नाही .या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागांकडुन दि.15.05.2019 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

कर्मचारी विषयक ( Employee Related ) भरती / योजना तसेच ताज्या बातम्यांच्या नियमित अपडेटसाठी Whatsapp group मध्ये सामिल व्हा .

Leave a Comment