Investment Tips for 2023 : कमी वेळेमध्ये जास्त पैसे मिळवायचे असतील, तर आजच या योजनेमध्ये गुंतवणूक करा, आर्थिक बाजू भक्कम करा!

Spread the love

Investment Tips for 2023 : अनेक लोकांना अगदी कमी कालावधीमध्ये जास्त पैसे कमवण्याचा नाद असतो. पण त्यासाठी मित्रांनो त्या प्रकारे रणनीती आखावी लागत असते. अगोदरच एखाद्या व्यक्तीकडे पैशाची कमतरता असेल आणि त्यावेळी एखाद्या योजनेमध्ये त्या व्यक्तीने पैसे गुंतवले तर खिशामध्ये फारच कमी पैसे शिल्लक राहतात. या गोष्टीकडे देखील लक्ष दिले पाहिजे.

अशा प्रकारामुळे लोक गुंतवणूक करण्यास घाबरतात. पण यामध्ये जास्त विचार करायची गरज नाही सध्या अशा काही योजना राबवल्या जात आहेत ज्या कमी वेळेमध्ये जास्त परतावा देत आहेत आणि या योजनेचा लाभ घेऊन अनेकांनी आपली आर्थिक बाजू भक्कम केली आहे. चला तर मग या योजनांबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया…

1) पोस्ट ऑफिसची आवर्ती ठेव योजना! (Post office avrti thev yojana)

शासना अंतर्गत राबवलेल्या पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये फक्त आणि फक्त शंभर रुपये गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये 18 वर्षावरील कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. यासोबतच गुंतवणुकीचे सर्व पैसे हे प्रत्येक तिसऱ्या महिन्यात खात्यामध्ये जमा होतात. मित्रांनो चक्रवाढ व्याजाचा लाभ देखील या योजनेमध्ये मिळत असतो.

  1. म्युच्युअल फंड! (Mutual Fund)

मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या भविष्याची आर्थिक बाजू भक्कम करायचे असेल व तुमचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल तर अशावेळी योग्य ती माहिती घेऊन तुम्ही म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता आणि यामध्ये मधून चांगलाच परतावा देखील मिळवू शकता. दीर्घकालीन कालावधी करिता या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर हा एक तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

यामध्ये गुंतवणूक करत असताना एका गोष्टीकडे लक्ष द्यावे ती म्हणजे ह्या योजनेमधील गुंतवणूक बाजारातील जोखीमच्या आधीन आहे. त्यामुळे कोणत्याही गुंतवणूक करण्यापूर्वीच तज्ञ लोकांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करा. जेणेकरून तुमचे यामध्ये आर्थिक नुकसान होणार नाही.

  1. KVP योजना! (Kisan vikas patr yojana)

मित्रांनो जर तुम्हाला काही वर्षांमध्येच गुंतवणूक करून गुंतवणुकीच्या डबल पैसे मिळवायचे असतील तर किसान विकास पत्र योजनेमध्ये तुम्ही त्वरित गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.9% इतके व्याज मिळते.

  1. LIC जीवन आनंद पॉलिसी (Life insurance policy)

मित्रांनो जर तुम्हाला एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्येच गुंतवणूक करायचे असेल तर या माध्यमातून तुम्हाला चांगलाच बोनस मिळत असतो. तसेच ह्या पॉलिसीच्या माध्यमातून एखाद्या पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला असेल तर त्याला गुंतवणुकीच्या 125% इतका मृत्यू विमा दिला जातो. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही योजना चांगली आहे. या पॉलिसी ची किमान विमा रक्कम ही एक लाख रुपये आहे आणि या पॉलिसीमध्ये कोणतीही कमाल मर्यादा नाही.

Leave a Comment