LPG Price Updates : नववर्षातील LPG सिलेंडरचे दर इतक्या रुपयांनी कमी होणार असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा! पहा नवीन आकडेवारी :

Spread the love

LPG Price Updates : मित्रांनो आता डिसेंबर महिना संपत आला असून लवकरच नवीन वर्षामध्ये प्रदारपण होईल. म्हणजेच आता सर्वांचीच वाटचाल नवीन वर्षाकडे सुरू आहे. अशावेळी आता नवीन वर्षामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आम्ही घेऊन आलो आहोत.

यामध्ये महागड्या एलपीजी सिलेंडरच्या दरा बाबत आता सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच दिलासा मिळू शकतो. दरम्यानच्या काळात याच वर्षी जुलैपासूनच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती 30 टक्के खाली आले आहेत. तेव्हापासूनच भारत देशामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ही 1056 इतकी आहे.

जुलै 2022 नंतर किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही…

मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सतत पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किमतीत चढ-उतार झालेले पाहायला मिळत आहेत. भारत देशांमधील तेल व वायू या किमतीमध्ये देखील चढ-उतार सुरूच आहेत. शासनाने तेलाच्या व वायूच्या किमती ठरवण्याचे संपूर्ण अधिकार हे शासकीय कंपन्यांना दिले आहेत.

त्या कंपन्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सहा जुलै 2022 पासून एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याच कालखंडामध्ये आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्चे तेल आणि वायूच्या किमती 30% पर्यंत घसरले आहेत. म्हणजेच कंपन्या गॅस व तेल अगदी स्वस्त दरामध्ये विकत घेत आहेत आणि ते लोकांना अगदी महागडे किमतीत विकत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती 30 टक्क्यांपर्यंत घसरल्या

ऑक्टोंबर 2022 मध्ये कच्च्या तेलाची किंमत ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये प्रति बॅरल 85 डॉलर इतकी होती. त्या काळखंडात देशांमध्ये एलपीजी सिलेंडर हा 899 रुपयांना होता. तेव्हापासूनच बघितले तर आतापर्यंत शासनाने सिलेंडरच्या दरात दीडशे रुपयांनी वाढ केली.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत ही प्रति बॅरेल मागे 83 डॉलर इतकी झाली आहे. म्हणजे 2021 ऑक्टोबर पासून तेलाच्या किमती देखील कमी झाले आहेत. त्यानुसार नवीन वर्षामध्ये शासन एलपीजी गॅस सिलेंडर वर दीडशे रुपये पर्यंत कपात करू शकते अशी शक्यता दिसत आहे.

राजस्थान सरकारच्या सट्टेमुळे दबाव वाढला!

पुढील वर्षी राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून अशाच वेळी सीएम अशोक गोहलोत यांनी एक घोषणा केली आहे ती म्हणजे एक एप्रिल 2023 पासून राजस्थान मधील नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडरवर पाचशे रुपये अनुदानाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिले जातील.

सध्या जयपूर मध्ये एका सिलेंडरची किंमत 1056 इतकी आहे. म्हणजे येणारे काळात गेहलोत शासन सिलेंडरच्या किमती अर्ध्यापेक्षा कमी करू शकते. या माध्यमातून लोकांना एलपीजी सिलेंडर घेण्यास कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही.

Leave a Comment